Pune Metro Daily Pass: कुठेही, कितीही वेळा फिरा; फक्त 100 रुपयांत! गणेशोत्सवापूर्वी पुणे मेट्रोची भन्नाट योजना

Pune Metro Daily Pass: हा 100 रुपयांचा डेली पास सुरू झाल्यामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. पुण्यामध्ये गणेशोत्सव ( Pune Ganesh Utsav 2025) ) मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून लोकं पुण्यात येत असतात. विविध मंडळांचे गणपती पाहायचे असल्यास ट्रॅफीक जॅम, पार्किंगची समस्या यामुळे गणेशभक्तांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करणे आणि गणबती बाप्पाचे दर्शन घेणे हे फार अवघड बनते. पुणे मेट्रोने यावर एक तोडगा काढला आहे. फक्त 100 रुपयांमध्ये दैनिक पास ( Pune Metro Daily Pass ) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पासधारक दिवसातून कुठेही कितीही वेळा या पासवर प्रवास करू शकतील. पुणे मेट्रोने या संदर्भातील माहिती दिली आहे.  

( नक्की वाचा: पुणे मेट्रो स्थानकात तोबा गर्दी, मुंबईतील लोकल स्थानकासारखी धक्काबुक्की )

कसा घेता येईल डेली पासचा लाभ? 

सणासुदीच्या काळात पुणे शहरात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी (Traffic Jam) आणि पार्किंगची समस्या यामुळे अनेकदा नागरिक त्रस्त होतात. यावर तोडगा म्हणून पुणे मेट्रोने हा डेली पास आणला आहे. केवळ 100 रुपये भरून प्रवाशांना दिवसभर पुणे मेट्रोने ( Pune Metro ) प्रवास करता येणार आहे. यामध्ये त्यांना कितीही वेळा प्रवास करता येईल आणि कोणत्याही स्टेशनवर उतरता येईल किंवा चढता येईल. यामुळे खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांचा वेळ वाचणार आहे आणि प्रवासही अधिक सोयीस्कर होणार आहे. ही सेवाल कधीपासून सुरू होणार आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

Advertisement

पुणे मेट्रोच्या कोणत्या मार्गांसाठी आहे डेली पास?

पुणे मेट्रोने आतापर्यंत दोन मार्गांवर आपली सेवा सुरू केली आहे:

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (Pimpri-Chinchwad to Swargate)

वनाझ ते रामवाडी (Vanaz to Ramwadi)

( नक्की वाचा: माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी, पुणेकरांसाठी आनंदवार्ता

प्रवासी आणि मेट्रो दोघांना फायदा होण्याची अपेक्षा

या दोन्ही मार्गांवर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. हा 100 रुपयांचा डेली पास सुरू झाल्यामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात, जेव्हा नागरिक दर्शनासाठी आणि खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतात, तेव्हा हा पास त्यांना खूप फायदेशीर ठरेल. यामुळे मेट्रोलाही अधिक उत्पन्न मिळेल आणि शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला (Public Transport) चालना मिळेल अशी अपेक्षा आहे . पुणे मेट्रोचा वापर वाढल्यास रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यासोबतच प्रदूषण (Pollution) नियंत्रणात येण्यासही मदत होईल. मेट्रोचा प्रवास सुरक्षित, आरामदायक आणि वेगवान असल्यामुळे अधिकाधिक नागरिक या योजनेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे.  
 

Advertisement