- इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या युद्ध सुरू असून त्याचा परिणाम आखाती देशांवर दिसत आहे
- दुबईमध्ये शैक्षणिक सहलीसाठी गेलेले पुण्यातील इंदिरा महाविद्यालयाचे ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षक युद्धामुळे अडकले
- या विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या
सुरज कसबे
सध्या इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाच भडका उडाला आहे. आखाती देशाना त्याची झळ पोहोचत आहे. त्यामुळे अनेक जण दुबई, बहरीन, दोहा या ठिकाणी अडकले आहेत. या युद्धामुळे जगभरातील अनेक विमान उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे. दुबईत अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले जवळपास 80 विद्यार्थी दुबईत अडकून पडले आहेत. त्यांनी या युद्धाचे काही अंगावर काटा आणणारे व्हिडीओ ही शेअर केले आहेत. शिवाय भारतात सुरक्षित परत येण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला विनंत ही केली आहे.
पुण्यातील इंदिरा कॉलेजचे 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षक दुबईला गेले होते. मात्र ते या युद्धामुळे तेथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. पुण्यातील नामांकित अशा इंदिरा महाविद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे किंवा विमानसेवेतील व्यत्ययामुळे हे 84 जण तेथे अडकले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच महाविद्यालय प्रशासन आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अडकलेले सर्व 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षक पूर्णपणे सुरक्षित आहेत.परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय या दोन्ही यंत्रणा विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. सर्व विद्यार्थी सुखरूप असून त्यांना लवकरच परत आणले जाईल, त्यामुळे पालकांनी किंवा नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.
दरम्यान आम्ही सातत्याने विद्यार्थ्यांच्या आणि सरकारी यंत्रणांच्या संपर्कात आहोत. सर्व 84 जण सुरक्षित असून त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कॉलेज प्रशासनाने म्हटले आहे. इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या युद्ध पेटले आहे. त्यात इराणचे सर्वेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्त्रायल हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराणने ही आपले हल्ले वाढवले आहेत. अमेरिकेच्या अखाती देशातील तळांवर हे हल्ले होत आहेत. त्यात दुबईचा ही समावेश आहे. त्यामुळे दुबईतले वातावरण ही तणावपूर्ण आहे. दुबाईतून परदेशात जाणारी असंख्य उड्डाण ही रद्द करण्यात आली आहे. त्याचा फटका इथल्या प्रवाशांना बसत आहे.