भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्गाचा विस्तार आता मुंबईपर्यंत करण्यात येत आहे. यामुळे मुंबईहून पुणे गाठण्यासाठी लवकरच तिसरा महामार्ग उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. शिवाय वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 830 किमी लांबीचा मुंबई-पुणे-बंगळुरु द्रुतगती महामार्ग आहे. सध्या पुणे ते बंगळुरू या टप्प्याचे काम सुरू आहे. तर मुंबई-पुणे विभागातही कामाला गती देण्यात येत आहे.
मुंबई-पुणे मार्गावरील पागोटे चौक दरम्यानच्या 29.129 किमी लांबीच्या टप्प्याचा आराखडा पूर्ण झाला आहे. तर चौक – पुणे, शिवारे दरम्यानच्या 100 किमी लांबीच्या टप्प्याच्या आराखड्याचे काम प्रगतीपथावर आहे. पागोटे-चौक टप्प्याच्या बांधकामासाठी दिवाळीनंतर निविदा प्रसिद्ध करण्याची तयारी NHAI ने केली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत निविदा अंतिम करून नवीन वर्षात म्हणजेच 2026 मध्ये या महामार्गाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
हा तिसरा महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर सध्याच्या मुंबई-पुणे महामार्गावरील प्रचंड ताण कमी होणार आहे. विशेष म्हणजे, या नव्या द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ दीड तासांत म्हणजेच 90 मिनिटांत पार करणे शक्य होईल. 3653 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी रायगडमधील भूसंपादनाचे 60 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 830 किमी लांबीचा मुंबई-पुणे-बंगळुरु द्रुतगती प्रकल्पाचे काम सुरू आहे.
मुंबई-पुणे महामार्गातील पागोटो चौक दरम्यानच्या 29.129 किमी लांबीच्या महामार्गाचा आराखडा हा पुर्ण तयार झाला आहे. तर चौक - पुणे, शिवारे दरम्यानच्या 100 किमी लांबीच्या टप्प्याच्या आराखड्याचे काम सुरू आहे. पागोटे चौक आणि चौक पुणे, शिवारे महामार्ग पूर्णपणे तयार झाल्यास मुंबई-पुण्यासाठी तिसरा द्रुतगती महामार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. या तिसऱ्या सुपरफास्ट महामार्गामुळे सध्याच्या मुंबई-पुणे महामार्गावरील ताण कमी होणार आहे. शिवाय वाहतूक कोंडीदेखील कमी होईल. प्रवासाचा वेळ ही कमी होणार आहे.