Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! स्वारगेट भुयारी मार्ग 3 दिवस बंद राहणार, वाहतूक मार्गात 'हा' बदल

Pune Traffic Alert: पुणे शहरातील स्वारगेट परिसरातील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
पुणे:

Pune Traffic Alert:  पुणे शहरातील स्वारगेट परिसरातील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कै. केशवराव जेधे चौक (स्वारगेट) येथील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:00 वाजल्यापासून ते 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7:00 वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर, हिंमत जाधव यांनी दिली.

वाहतुकीतील बदल आणि पर्यायी मार्ग

या दुरुस्ती कामाच्या काळात, केशवराव जेधे चौक स्वारगेट येथील भुयारी मार्गाने सारसबागकडे (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

वाहनचालकांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा

भुयारी मार्ग सुरू होण्यापूर्वी डावीकडील रस्त्याने जेधे चौकाकडे जावे.

तेथून सारसबागकडे (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहनचालकांनी या बदललेल्या मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Atal Setu Potholes: 17,840 कोटींच्या अटल सेतूवर दीड वर्षातच खड्डे; MMRDA ने दिले स्पष्टीकरण )
 


परिवहन मंत्र्यांची स्वारगेट स्थानकाला भेट

दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी स्वारगेट बस स्थानकाला भेट दिली होती.आपली जबाबदारी सक्षमपणे न पाळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना निलंबनानंतर पुन्हा त्याच जागेवर नियुक्ती देणे हे त्यांच्या दोषावर पांघरून घालण्यासारखे आहे. अशा गंभीर चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले. 

( नक्की वाचा : New Bike Price: Royal Enfield, Hero, TVS सह अनेक दुचाकी 22 हजार रुपयांपर्यंत स्वस्त, सर्व किंमती इथे पाहा! )
 

फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व राज्य हादरुन गेले होते. त्यानंतर एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. तो संदर्भ देत सरनाईक यांनी हा इशारा दिला. 
 

Advertisement
Topics mentioned in this article