Pune Rain : पुणेकरांना जोरदार पावसानं झोडपलं, पुढील 24 तास रेड अलर्ट

जाहिरात
Read Time: 1 min
संध्याकाळी सुरु झालेल्या पावसामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या पुणेकरांची तारंबळ उडाली. (प्रातिनिधिक फोटो)
पुणे:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याला आता काही तास उरले आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी (26 सप्टेंबर) पुण्यात भूयारी मेट्रो रेल्वेसह वेगवेगळ्या कार्यक्रमांचं उद्घाटन तसंच भूमीपूजन होणार आहे. त्याचबरोबर सर परशूराम भाऊ महाविद्यालयाच्या (एसपी कॉलेज) प्रांगणात पंतप्रधानांची सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर पावसाचं सावट पसरलं आहे. पुणे शहरात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं आहे. संध्याकाळी सुरु झालेल्या पावसामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या पुणेकरांची तारंबळ उडाली.

पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केल आहे. पुढील 24 तासांमध्ये जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.  

खडकवासला धरणातून विसर्ग सुरु

पुणे आणि परिसरात सतत सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. संध्याकाळी  2 हजार 568 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच खबरदारी घ्यावी, असं आवाहन मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

Topics mentioned in this article