रमाकांत आचरेकरांच्या शिवाजी पार्कातील आठवणी ताज्या होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय दिला असून क्रिकेट प्रेमी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळा उत्साह निर्माण झाला आहे.

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

क्रिकेट विश्वातील एक महत्त्वाचं नाव रमाकांत आचरेकर यांचा सहा फुटांचा पुतळा लवकरच शिवाजी पार्क येथे उभारण्यात येणार आहे. कित्येक खेळाडूंचे गुरू असलेले रमांकात आचरेकर यांचा पुतळा लवकरच शिवाजी पार्कवर पाहता येणार आहे.  राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय दिला असून क्रिकेट प्रेमी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. मात्र हा पुतळा आता लवकरात लवकर कधी बांधला जातोय याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले कोच रमाकांत आचरेकर यांचं 2019 मध्ये निधन झालं. सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित आणि प्रवीण आमरे यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना त्यांचं मार्गदर्शन मिळालं होतं. त्यामुळे क्रिकटविश्वास गुरू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेल्यावर्षी आचरेकरांच्या वाढदिवशी सचिन तेंडूलकरने त्यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करून भावुक संदेश दिला होता.