RBI News: 2000 रुपयांच्या किती नोटा अजूनही चलनात, आरबीआयने दिली मोठी माहिती

आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, 19 मे 2023 च्या अखेरीस 2000 रुपयांच्या चलनात असलेल्या नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दोन वर्षांपूर्वी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या होत्या. तरीही, आजमितीस जवळपास 6,181 कोटी रुपये मूल्याच्या नोटा अजूनही चलनात आहेत. सोमवारी 2 जून 2025 ला आरबीआयने अधिकृत आकडेवारी जाहीर केली. त्यानंतर  ही माहिती समोर आली आहे. या 2000 रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर चलन (legal tender) आहेत. आरबीआयने 19 मे 2023 रोजी 2000  रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, 19 मे 2023 च्या अखेरीस 2000 रुपयांच्या चलनात असलेल्या नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. ते 31 मे 2025 रोजीच्या अखेरीस 6,181 कोटी रुपयांपर्यंत कमी झाले आहे. 2000 रुपयांच्या 98.26 टक्के नोटा या परत आल्या आहेत.  बँकेने सांगितले की, "अशा प्रकारे, 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या 98.26 टक्के नोटा या बँकेत परत आल्या आहेत.

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 Final: जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोण ठरणार चॅम्पियन? नियम काय सांगतात?

या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची सुविधा 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व बँक शाखांमध्ये उपलब्ध होती. आता ही सुविधा केवळ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 19  कार्यालयांमध्ये (issue offices) उपलब्ध आहे. आरबीआयच्या काही कार्यालयात 9 ऑक्टोबर 2023 पासून व्यक्ती आणि संस्थांकडून त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत.

ट्रेंडिंग बातमी - Raigad News: नॅपकिनवरून राजकारण पेटलं, तटकरेंना थेट वेटर म्हटलं, गोगावलेंची आरपारची भाषा

याव्यतिरिक्त, लोक देशातील कोणत्याही टपाल कार्यालयातून भारतीय पोस्टाद्वारे 2000 रुपयांच्या नोटा, कोणत्याही आरबीआय कार्यालयात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी पाठवू शकतात. असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र किती नोटा परत आल्या आणि किती नोटा चलनात आहेत, याची आकडेवारी मात्र या निमित्ताने पुढे आली आहे. 

Advertisement