गेल्या काही दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोकणासह मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आणि नाशिक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच्या सुचना मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाणे, पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारीही या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रविवारीही पावसाचा आंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. नाशिकमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय मुंबईत ही मुसळधार पावसाचा इशारा आहे.
ट्रेंडिंग बातमी - रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल झाल्या रद्द?
एकीकडे मुंबईत मुसळधार पावसाचा आंदाज वर्तवला जात असताना दुसरीकडे मात्र मुंबईत उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल या काळात रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग हे बदलण्यात आले आहेत. त्यामुळे जर रविवारी घरा बाहेर पडण्याचे ठरवले असाल तर रेल्वेचे रविवारचे मेगाब्लॉक दरम्यानचे वेळापत्रक नक्की बघून घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वेने केले आहे.