सचिन तेंडुलकर क्रिकेट अॅकेडमी तर्फे मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. या प्रशिक्षणचा शुभारंभ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. शिवाय क्रिकेटसाठी प्रोत्साहन ही दिले. या शिबीराच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार करण्याचा अॅकेडमीचा प्रयत्न आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सचिन तेंडुलकर यांची अॅकेडमी ही नवी मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडिअम येथे आहे. इथंच नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना शास्त्रशुध्द क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येईल. हे तीन दिवसांचे शिबीर असणार आहे महानगरपालिकेच्या शाळांतील 240 मुलांची अंतिम चाचणीसाठी निवड केली.
यावेळी सचिन तेंडुलकर यांनी मुलांशी संवाद साधला. या 240 मुलांपैकी 20 मुले आणि 20 मुलींची निवड केली जाणार आहे. त्यांना वर्षभर विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण या अॅकेडमीत देण्यात येणार आहे. या मुलांना क्रिकेट किटही ॲकेडमीमार्फतच देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना क्रिकेट खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
ट्रेंडिंग बातमी - DC Vs LSG: दिल्लीच्या आशुतोषची कमाल खेळी! हरलेला सामना फिरवला, लखनौचा पराभव
या माध्यमातून चांगेल खेळाडू तयार करण्याचा मानस आहे. शिवाय चांगले खेळाडू पुढे येतून त्यांचा फायदा देशाला होणार आहे असं अॅकेडमीचं म्हणणं आहे. त्यानुसार या खेळाडूना तयार केलं जाणार आहे. त्यांना हरएक प्रकारचे सहकार्य केले जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. स्थानिक मुलांनाही त्यामुळे एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळणार आहे.