"जयदीप आपटेची बोटं छाटून आणा, तसे करणाऱ्याला...' थेट बक्षिस जाहीर केलं

सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या समाजाच्या प्रतिनिधींनी आता जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याला बक्षिस जाहीर केलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बदलापूर:

सिंधुदुर्गातील राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर त्याच्या तिव्र प्रतिक्रीया संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या घटनेनंतर हा पुतळा बनवणारा जयदीप आपटे हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. पण तो अजूनही सापडलेला नाही. त्याचा दुसरा साथीदार चेतन पाटील या मात्र पोलीसांनी कोल्हापुरातून जेरबंद केला आहे. आता या प्रकरणी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या समाजाच्या प्रतिनिधींनी आता जयदीप आपटेची बोटं छाटून आणणाऱ्याला बक्षिस जाहीर केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळ मिळण्याची शक्यता आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होण्यास कारणीभूत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याची बोटं छाटून आणणाऱ्याचा जाहीर सत्कार करू, अशी घोषणा बदलापूरमधील सकल मराठा समाजाने केली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा बदलापूरमध्ये सकल मराठा समाजाने निषेध केला. त्यावेळी समाजाचे नेते अविनाश देशमुख यांनी आपली भावना व्यक्त केली. महाराष्ट्रात या घटनेनंतर शिवप्रेमींच्या भावना या तिव्र असल्याचे ते म्हणाले. निषेध करणे, मेणबत्ती लावणे आम्ही करणार नाही. आम्हाला आता कठोर धोरण घ्यावेच लागेल असे यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले. 

ट्रेंडिंग बातमी - शिवरायांचा पुतळा कोसळला, मोठी कारवाई, फरार चेतन पाटीलला 'अशा' ठोकल्या बेड्या

छत्रपती शिवाजी महाराजांचा कमकुवत पुतळा तयार करून तो पडण्यास शिल्पकार जयदीप आपटे हाच जबाबदार असल्याचे सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.सध्या तो फरार आहे. त्याची बोटं जो कोणी छाटून आणेल, त्याचा बदलापूरमध्ये जाहीर सत्कार करू अशी घोषणाच करण्यात आली आहे. शिवाय त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदनही दिले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम जयदीप आपटे याच्या कंपनीने घेतले होते. याचा बांधकाम सल्लागार हा चेतन पाटील होता. हा पुतळा कोसळल्यानंतर या दोघां विरोधात गुन्हाही दाखल झाले. त्यानंतर हे दोघेही फरार झाले होते. त्यातील चेतन पाटील याला पोलीसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे. तर जयदीप अजूनही फरार आहे. फरार जयदीपचा सकल मराठा समाजही शोध घेत असल्याचे यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी सांगितले.  

Advertisement