अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही. राज्यात कुठे ना कुठे आत्याचार झाल्याच्या घटना या समोर येतच आहेत. त्यात महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. याघटनेत एका अल्पवयीन मुलाने एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला. या अत्याचाराच त्या चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या घटनेची चौकशी करताना पोलीसांनी त्या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलीस ही हादरून गेले आहेत.
ही घटना मुंबईतल्या कांदीवली पश्चिमेला असलेल्या लालजी पाडा इथं घडली आहे. या भागात एक 16 वर्षाचा तरुण राहतो. त्याच्या शेजारी एक पाच वर्षांची चिमुरडी ही राहते. ती तिच्या घरा बाहेर खेळत होती. त्यावेळी या तरुणाने तिच्याशी गोड बोलून तिला आपल्या घरात बोलावले. त्यानंतर त्या चिमुरडीवर त्याच्याच घरात अत्याचार केले. त्यावेळी शेजारीच राहाणाऱ्या व्यक्तीच्या हा बाब लक्षात आली. त्याने त्या मुलाली तिथे पकडे. पण तोपर्यंत त्याने अत्याचार केले होते.
प्रत्यक्षदर्शीने त्यावेळी त्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचं आढळलं. तिला तातडीने शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिच्यावर सध्या त्या ठिकाणी अपचार सुरू आहे. त्यानंतर संबंधीत तरुणाला पोलीसांनी अटक केले आहे. त्याची कसून चौकशी केली गेली. त्यानंतर त्याच्या चौकशीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. त्यात त्याने हे कृत्य का केले याची ही माहिती पोलीसांना दिली आहे. चौकशी दरम्यान त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
त्या व्हिडीओत तो आपण एक गोळी खाल्ली असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आपलं आपल्यावरील नियंत्रण सुटले. डोके जड झाले होते. काही सुचत नव्हते. आपण काय करतोय याचे ही भान नव्हते. त्या गोंधळात आपल्या हातून हे कृत्य झाले असं त्याने सांगितले आहे. पोलीसांसाठी हा मोठा धक्का होता. आरोपी हा अल्पवयीन आहे. या घटनेनंतर लालजी पाडा इथं संतप्त झाले आहेत. त्यांनी संबंधीत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी केली आहे. या ठिकाणी संतप्त नागरिकांनी ही आंदोलन केले. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत.