सिद्धेश कदम यांच्या कामाचा धडाका, दिल्या 'या' ठिकाणांना भेटी

बांद्रा येथे उभारण्यात येत असलेल्या अत्यंत अत्याधुनिक अशा 350 एम. एल. डी. सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणा प्रकल्पाची देखील या भेट दौऱ्यादरम्यान त्यांनी पाहणी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या मालाड, वर्सोवा, बांद्रा आणि धारावी येथील सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणेची पाहाणी केली.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयआयटीएम यांच्या सतत हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांना ही भेटी दिल्या. आजच्या या भेटीची सुरुवात त्यांनी मालाड येथील एमडीपी क्रिक रोड येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सतत हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रापासून केली. यावेळी हवेची गुणवत्ता कशी तपासली जाते याबाबत तांत्रिक माहिती जाणून घेतली.  काही दिवसांपूर्वी येथील हवा गुणवत्ता कोणत्या कारणामुळे खालावली होती याबाबत देखील माहिती सिद्धेश कदम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून सविस्तरपणे जाणून घेतली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यानंतर त्यांनी मालाड येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणेच्या प्रकल्पाचा देखील आढावा घेतला. या प्रकल्पाचे काम सन 2028 मध्ये पूर्ण होणार आहे.  400 एम.एल.डी. पेक्षा जास्त सांडपाणी या प्रकल्पात शुद्ध केले जाणार आहे. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अभियंता व इतर अधिकारी वर्गाकडून या संपूर्ण प्रकल्पाच्या कामाबाबत त्यांनी सविस्तरपणे माहिती जाणून घेतली.

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

तसेच मुंबई महानगरपालिकेच्या वर्सोवा येथे उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पास देखील त्यांनी भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली. सदरील प्रकल्प हा 180  एम. एल. डी. क्षमतेचा असून पुढील दोन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाणार आहे. यावेळी मुंबई महानगरपालिका आणि प्रकल्प उभारणीचे अभियंता यांच्याकडून सिद्धेश कदम यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उभारलेल्या सतत वातावरणीय हवा गुणवत्ता केंद्रांची पाहणी करण्याच्या अनुषंगाने सिद्धेश कदम यांनी मालाड येथील फायर ब्रिगेड स्टेशन जवळील केंद्राला व कूपर हॉस्पिटल येथील केंद्राला भेट दिली. यावेळी गेल्या दोन महिन्यांचा तांत्रिक आढावा देखील त्यांनी घेतला.

ट्रेंडिंग बातमी - Union Budget 2025 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

यासोबतच बांद्रा येथे उभारण्यात येत असलेल्या अत्यंत अत्याधुनिक अशा 350 एम. एल. डी. सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणा प्रकल्पाची देखील या भेट दौऱ्यादरम्यान त्यांनी पाहणी केली. यावेळी अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून कशाप्रकारे ते शुद्ध केले जाते आणि त्यामुळे जवळ जवळ लाखो लिटर पाण्याची कशी बचत होईल याचे प्रात्यक्षिक संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर सादर केले. तसेच येथे कार्यान्वित असलेली छोटी यंत्रणा याबाबत देखील लार्सन ॲण्ड टुब्रो या प्रकल्प उभारणीच्या अभियंत्याने सिद्धेश कदम यांना माहिती दिली. यासह धारावी येथील नव्याने उभ्या राहत असलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पालाही भेट देऊन या प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला व सदरील कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.

Advertisement