Siya Goyal: हातात ग्लास, लाईटचा झगमगाट, DJ चा दणदणाट! सियाला कसलं कसलं व्यसन? एका व्हिडीओने झाली पोलखोल

आता केतनची आई ही याबाबत बोलत आहे. त्यांनी सियाच्या आई-वडीलांवर गंभीर आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

सूरज कसबे 

सिया गोयलची आता राज्यातच नाही तर देशात चर्चा आहे. अवघ्या 21 वर्षाच्या सियाने जो काही कारनामा केला आहे त्याने सर्वच जण आवाक आहेत. या घटनेनंतर सियाच्या एक-एक गोष्टी समोर येत आहे. बाहेर येणार प्रत्येक गोष्ट ही धक्कादायक आणि तेवढीच काळजी करण्या सारखी ही आहे. सिया ही एक श्रीमंत घराण्यात वाढलेली मुलगी होती. पण तिला लागलेल्या सवई या वाईट होत्या. त्याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यातून तिला कोणत्या कोणत्या सवई होत्या हे समोर आले आहे. म्हणजेच आता हे प्रकरण केतन अग्रवालच्या हत्येपर्यंत मर्यादीत राहीले नाही. तर सिया वैयक्तीक जिवनात ही कशी होती या गोष्टींची ही चर्चा होत आहे. 

Advertisement

सियाचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ तिच्या वाढदिवसाचा आहे. 19 जून 2024 चा हा व्हिडीओ आहे. तिने आपल्या वाढदिवसाची पार्टी एक पबमध्ये दिल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. त्यात ती पुर्ण पणे टल्ली झालेली दिसते. नशेत ती जबरदस्त डान्स ही करत आहे. विशेष म्हणजे यावेळी डीजेवर लागलेलं गाणं ही पिते दारु पिते जाओ या गाण्यावर ती आणि तिचे मित्र थिरकत असताना दिसत आहेत. लाईटचा झगमगाट आहे. जीडेचा दनदनाट आहे. त्यात ही बेहोश होवून नाचत आहे. तिच्यासाठी दारू आणली जात आहे हे ही या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा - Lohagad case: केतन अग्रवालच्या हत्ये मागे क्राईम पेट्रोल कनेक्शन! सिया- चेतनला 1 नाही तर 2 गोष्टी नडल्या

शिवाय तिच्यासाठी केक ही आणला गेला आहे. ती केस नशेतच कापताना दिसत आहे. शिवाय ती त्यावेळी ही थिरकताना दिसत आहे. यावरून तिची लाईफ ही पार्टी लाईफ होती हे स्पष्ट होतं. शिवाय लेट नाईट पर्यंत बाहेर थांबण्याची ही तिला सवय होती. ती ड्रिंक्स ही घेत होती हे ही आता स्पष्ट झालं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा पुण्यात रंगली  आहे. सिया आणि केतन यांची लाईफ स्टाईल मात्र वेगळी होती. केतन हा शांत आणि आपल्या बिझनसमध्ये गुतलेला होता. तर त्याच्या अगदी उलट सिया होती. ती पार्टी लाईफवर जास्त लक्ष देत होती. या गोष्टी मात्र केतनच्या घरच्यांना माहित नव्हत्या.   

नक्की वाचा - Lohagad Exclusive: केतनला धक्का दिल्यानंतर सियानं काय केलं? तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकाने सांगितला थरार

आता केतनची आई ही याबाबत बोलत आहे. त्यांनी  सियाच्या आई-वडीलांवर गंभीर आरोप केला आहे. सियाच्या पार्टी गर्ल लाईफस्टाईल बद्दल आणि तिच्या दारू पिण्याच्या सवयींबद्दल आमच्यापासून खरी माहिती पूर्णपणे लपवून ठेवली होती, असा दावा केतनच्या आईने केला आहे. लग्न ठरवण्यापूर्वी सियाची जी कौटुंबिक आणि सुसंस्कृत प्रतिमा आमच्यासमोर उभी करण्यात आली होती, ती प्रत्यक्षात पूर्णपणे वेगळी होती, असे त्यांनी सांगितलं.  सियाच्या सोशल मीडियावरील व्हिडिओ बाबत बोलताना त्या म्हणाल्या की ते व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक गोष्टी लक्षात आल्या. लग्न ठरवताना मुलीची खरी पार्श्वभूमी आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवली गेल्याचा आता अग्रवाल कुटुंबाकडून केला जात आहे.

Advertisement