एसटी महामंडळाने जवळपास टक्के भाडेवाढ केली होती. तसा निर्णय ही झाला होता. दिवाळी येत असल्याने या भाडेवाढीचा थेट फायदा एसटीला झाला असता. पण सर्व सामान्यांच्या खिशाला मात्र कट लागणार होता. अशा स्थिती या भाडेवाढीबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. परिवह मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ जाहीर केली होती. या घोषणेला चोवीस तास होत नाही तोच ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. याची घोषणा नाईक यांचेच नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवाय हा निर्णय का घेतला आहे याचे कारण ही त्यांनी दिले आहे.
राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली 10 टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले. शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला 30 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली 10 टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
हा निर्णय घेतल्याने सर्व सामान्यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीत सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेक जण गावी जात असतात. त्यात अनेकांचा कल हा एसटीने जाण्यात असतो. त्यामुळे या काळात एसटीला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. अनेक वेळा तर आरक्षण ही मिळत नाही. मात्र या भाडेवाढी मुळे सर्व सामान्यांमध्ये नाराजीचा सुरू निघत होता. मात्र आता ही भाडेवाढ रद्द केल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. ही भाडेवाढ राज्यातील पूर परिस्थिती पाहात मागे घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. सोमवारी ही भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती. त्याच्या चोवीस तासाच्या आत ती मागे घेण्यात आली.
नक्की वाचा - Dombivali News: ती रडत होती मात्र सांगू शकत नव्हती, जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा...
दिवाळीच्या हंगामात एसटीचे तिकीट 10 टक्क्यांनी वाढण्याची घोषणा करण्यात आली होती. ही भाडेवाढ 15 ऑक्टोबर पासून लागू होणार होती. ही वाढ 15 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर 2025 पर्यंत होती. सणाच्या 22 दिवसांसाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. विशेष म्हणजे या काळात ज्या प्रवाशांनी ॲडव्हान्स बुकिंग केले होते, त्यांना देखील जुना आणि नवीन दरातील फरक वाहकाकडे जमा करावा लागणरा होती. मात्र आता ही भाडेवाढच रद्द झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.