Dhirendra Shastri : भिवंडीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, अनेक महिलांची तब्येत बिघडली

भिवंडीमध्ये शनिवारी झालेल्या बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. या गर्दीमध्ये अडकलेल्या अनेक महिलांची तब्येत बिघडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भूपेंद्र अंबावणे, प्रतिनिधी

भिवंडीमध्ये शनिवारी झालेल्या बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. या गर्दीमध्ये अडकलेल्या अनेक महिलांची तब्येत बिघडली. अनेक महिलांना श्वास घेण्यात त्रास झाला. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. धीरेंद्र शास्त्री यांनी लोकांना विभूती घेण्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर गर्दी स्टेजच्या दिशेनं जमा झाली आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भिवंडीतील मानोली नाक्याजवळच्या इंडियन ऑईल कंपनीमध्ये बागेश्वर धाम महाराजांच्या प्रवचनाचं आयोजन केलं होतं. धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वर या नावानंही प्रसिद्ध आहेत. या प्रवचनात त्यांनी उपस्थित भाविकांना कथा सांगितली. तो कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी विभूती देणार असल्याची घोषणा केली. यावेळी पहिल्यांदा महिलांनी यावं आणि नंतर पुरुषांनी यावं असं आवाहन केलं.

विभूती घेण्यासाठी पहिल्यांदा महिलांची आणि नंतर पुरषांची रांग लावण्यात आली होती. पण, एकाचवेळी सर्वजण विभूती घेण्यासाठी स्टेजकडं जाऊ लागले. काही वेळामध्ये गर्दी इतकी वाढली की ती नियंत्रणाच्या बाहेर गेली. 

प्रत्येकाला विभूती हवी होती. त्यासाठी तो पुढे सरकत होता. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती. 

महिलांना श्वसनाचा त्रास

या घटनेचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये गर्दी दिसत आहे. या गर्दीत लोकं एकमेकांना ओढत होते. त्यावेळी उपस्थित काही बाऊन्सर्सी लोकांची मदत केली. त्यांनी लोकांना गर्दीतून बाहेर काढलं. गर्दीत अडकल्यानं अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना स्टेजवर एका बाजूला बसवून ठेवण्यात आलं होतं. 

Advertisement

( नक्की वाचा : Mumbai Metro : मेट्रोच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना )
 

ही गर्दी पाहून धीरेंद्र शास्त्री स्टेजवरुन उठून निघनून गेेले. त्यानंतर लोकं मोठ्या प्रमाणावर स्टेजवर जाऊ लागले. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. सुदैवानं या संपूर्ण दुर्घटनेत कुणीही मृत्यूमुखी पावल्याचं वृत्त नाही.