अविनाश पवार, प्रतिनिधी
Bhimashankar Temple Latest News : श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद असल्याची माहिती असतानाही अमेरिकेतून आलेल्या स्वामी नलिनानंद गिरी महाराज यांनी दर्शनासाठी दबाव टाकत उद्धट आणि उर्मट भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या विकासकामांना सहकार्य करण्याऐवजी देवस्थान ट्रस्ट व प्रशासनावर टीका करणे चुकीचे असल्याचे देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार,अमेरिकेतील “इटर्नल व्हॉईस” संस्थेचे अध्यक्ष असलेले स्वामी नलिनानंद गिरी महाराज यात्रेसाठी भारतात आले होते. त्यांच्या सोबत जवळपास 50 जणांचा ताफा होता.यामध्ये 20 अमेरिकन आणि 30 भारतीय नागरिकांचा समावेश होता. हे सर्व जण 15 गाड्यांमधून भीमाशंकर येथे दाखल झाले. सध्या मंदिर परिसरात सभामंडप विस्तार आणि पायरी मार्गाचे महत्त्वाचे काम सुरू असून भाविकांना भविष्यात अधिक सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्याचं ILS लॉ कॉलेज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, शेकडो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट, प्रकरण काय?
“आमच्या मोठ्या ओळखी आहेत”
या बंदला सर्वसामान्य भाविकांनी सहकार्य केले आहे आणि कोणालाही प्रवेश दिला जात नाही.असे असतानाही संबंधित महाराजांनी मोठ्या आवाजात मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला.“आमच्या मोठ्या ओळखी आहेत”,“हे तुम्हाला महागात पडेल”अशा धमकीवजा भाषेत त्यांनी दबाव टाकल्याचा आरोप आहे.मात्र कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार सुरेश काटे यांनी अत्यंत संयमाने व नम्रतेने त्यांना प्रवेश नाकारला.
नक्की वाचा >> ChatGPT ने बनवला 69,000 रुपयांचा खराखुरा वाटेल असा चेक, व्हायरल पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ
या घटनेदरम्यान महाराजांनी विविध ठिकाणी फोन करून परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही अधिकृत परवानगी मिळाली नाही.यावर प्रतिक्रिया देताना सरपंच दत्तात्रय हिले यांनी,“भीमाशंकरची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी,”अशी मागणी केली आहे.तर गवांदे यांनीही “परवानगी नसताना एवढ्या लोकांसह येऊन गोंधळ घालणे हे कोणत्याही धार्मिक व्यक्तीला शोभणारे नाही,”असे स्पष्ट केले.