Thane Metro: ठाणे, मीरा भाईंदर मेट्रोचे उद्घाटन यावर्षीच! घोडबंदर रोडबाबतही गुड न्यूज....

Thane Metro News : ठाणे आणि मीरा भाईंदर मेट्रोबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Thane Metro News :  ठाणे आणि मीरा-भाईंदर मेट्रोसाठी महत्त्वाचे अपडेट आहेत.
ठाणे:

Thane Metro News :  ठाणे आणि मीरा-भाईंदर भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेला मेट्रो 9 मार्ग 15 डिसेंबरपर्यंत तर मेट्रो 4 मार्ग 31 डिसेंबरपर्यंत सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यालयात आयोजित केलेल्या या आढावा बैठकीत महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनीकुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

काय आहेत अपडेट?

बैठकीत MMRDA मार्फत ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये रस्त्यांच्या कामांना गती देण्यावर मंत्र्यांनी भर दिला. 

घोडबंदर मार्गाचा भाग असलेल्या कापूरबावडी ते गायमुख या 10.32 किलोमीटर लांबीच्या सेवा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून ते मुख्य रस्त्यामध्ये विलीन करण्याचे काम 31 डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

Advertisement

ठाणे व मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले. 

मीरा-भाईंदर मुख्य रस्ता: विशेषतः मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महाराणा प्रताप पुतळा दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण जलद गतीने करावे, अशी सूचनाही सरनाईक यांनी केली. 

( नक्की वाचा : Mumbai Metro 3: मुंबईची Aqua Line पूर्ण क्षमतेने सुरू होणार! पाहा स्टेशन्सचा First Look; वाचा खास वैशिष्ट्ये )

मेट्रो पुलांखाली उद्याने विकसित करा

मेट्रो पुलाचे काम सुरू असताना त्याखालील मोकळ्या जागेवर भविष्यात अतिक्रमण होऊ नये किंवा ती जागा विद्रूप होऊ नये यासाठी उपाययोजना सुचवताना मंत्री सरनाईक म्हणाले की  नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर येथे सुशोभीकरण करून उद्याने उभी करावीत. या जागांची चांगली देखभाल व्हावी यासाठी जाहिरातीच्या मोबदल्यात कायमस्वरूपी देखभाल करणाऱ्या संस्थांची नेमणूक करावी.

Advertisement

या बैठकीत डोंगरी आणि मोघरपाडा येथे होणाऱ्या कारशेड प्रकल्पांचा देखील आढावा घेण्यात आला. भविष्यात ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरात होणाऱ्या मेट्रो स्थानकांना तेथील मूळ गावांची नावे देण्यात यावीत, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही सरनाईक यांनी केली. यामुळे त्या गावांची संस्कृती आणि परंपरा यांची ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
 ठाणे आणि मीरा-भाईंदर भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेला मेट्रो 9 मार्ग 15 डिसेंबरपर्यंत तर मेट्रो 4 मार्ग 31 डिसेंबरपर्यंत सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यालयात आयोजित केलेल्या या आढावा बैठकीत महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनीकुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

काय आहे अपडेट?

बैठकीत MMRDA मार्फत ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये रस्त्यांच्या कामांना गती देण्यावर मंत्र्यांनी भर दिला. 

घोडबंदर मार्गाचा भाग असलेल्या कापूरबावडी ते गायमुख या 10.32 किलोमीटर लांबीच्या सेवा रस्त्याचे कॉक्रेंटीकरण करून ते मुख्य रस्त्यामध्ये विलीन करण्याचे काम 31 डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

ठाणे व मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले. 

मीरा-भाईंदर मुख्य रस्ता: विशेषतः मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महाराणा प्रताप पुतळा दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण जलद गतीने करावे, अशी सूचनाही सरनाईक यांनी केली. 

मेट्रो पुलांखाली उद्याने विकसित करा

मेट्रो पुलाचे काम सुरू असताना त्याखालील मोकळ्या जागेवर भविष्यात अतिक्रमण होऊ नये किंवा ती जागा विद्रूप होऊ नये यासाठी उपाययोजना सुचवताना मंत्री सरनाईक म्हणाले की  नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर येथे सुशोभीकरण करून उद्याने उभी करावीत. या जागांची चांगली देखभाल व्हावी यासाठी जाहिरातीच्या मोबदल्यात कायमस्वरूपी देखभाल करणाऱ्या संस्थांची नेमणूक करावी.

या बैठकीत डोंगरी आणि मोघरपाडा येथे होणाऱ्या कारशेड प्रकल्पांचा देखील आढावा घेण्यात आला. भविष्यात ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरात होणाऱ्या मेट्रो स्थानकांना तेथील मूळ गावांची नावे देण्यात यावीत, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही सरनाईक यांनी केली. यामुळे त्या गावांची संस्कृती आणि परंपरा यांची ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
Topics mentioned in this article