रतन टाटा हे असं एक नाव आहे ज्यांनी सर्व सामान्यांची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात मोलाचं योगदान दिलं. प्रत्येक कुटुंबाला वाटतं आपल्याकडे कार असावी. पण ती खिशाला परवडणारी नव्हती. मग त्याला पर्याय म्हणून ते दुचाकीचा वापर करत असतं. संपुर्ण कुटुंब दुचाकीवरूनच प्रवास करत अशी स्थिती होती. एक दिवस रतन टाटा प्रवास करत होते. त्यावेळी ते आपल्या गाडीत होते. त्याच वेळी त्यांना एक कुटुंब टु व्हिलरवर दिसले. पती पत्नी दोन मुलं त्या छोट्या दुचाकीवर कसेबसे बसले होते. त्याच वेळी त्यांच्या मनाला चटका लागून गेला. जर या कुटुंबाकडे छोटी का होई ना कार असती तर? असा प्रश्न त्यांच्या मनात आला. त्या हे कुटुंब व्यवस्थित बसू शकले असते. त्यांना त्रासही झाला नसता. हा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. तिथून सुरू झाला स्वस्त कार बनवण्याचा रतन टाटा यांचा प्रवास.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टाटा नॅनो बाबत रतन टाटा यांनी अनेक वेळा आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या आहे. त्यांनी एकदा इंस्टाग्रामवरही एक पोस्ट लिहीली होती. त्यात ते म्हणाले होते की आर्किटेक्चर स्कूलचा असल्याने त्याचा फायदा होत होता. रिकाम्या वेळात ते डुडल काढत असता. त्याच वेळी त्यांच्या मनात एक संकल्पना आली होती. जर मोटरसायकल जास्त सुरक्षित झाली तर किती छान होईल. त्या दृष्टीने त्यांनी एका कारचे डुडल म्हणजेच स्केच तयार केले. ते बग्गी सारखे होते. त्याला दरवाजे ही नव्हते. त्यानंतर त्यांनी ठरवले की देशातील सर्व सामान्यांसाठी कार बनवायची. ज्यांचे कार घेण्याचे स्वप्न आहे पण खरेदी करण्याची क्षमता नाही, अशांसाठी रतन टाटांनी जी कार बनवली ती होती टाटा नॅनो. या कारला लाखमोलाची म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE: रतन टाटांच्या जाण्यानं हळहळ, राज्यात एक दिवसाचा दुखवटा
त्यानंतर नॅनोचे डिजाईन बनवण्याची जबाबदारी गिरीश वाघ यांना देण्यात आली. वाघ यांनी या आधीही टाटाच्या एका ड्रिम प्रोजेक्टवर काम केले होते. शिवाय ते सफल ही झाले होते. त्यांनी छोटा ट्रक म्हणजेच छोटा हत्ती तयार केला होता. त्यानंतर नॅनोच्या कामासाठी वाघ यांची टिम जवळपास पाच वर्ष काम करत होती. त्यानंतर रतन टाटा यांनी 18 मे 2006 साली पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि वाणिज्य मंत्री निरुपम सेन यांच्या बरोबर बैठक केली. त्यानंतर टाटा नॅनो कारचा निर्मिती कारखाना बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे सुरू केला जाईल अशी घोषणा केली. लगेचच जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली.
त्याच काळात ममता बॅनर्जी या त्यांचा पक्ष वाढवण्याचे काम करत होत्या. त्यांनी टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी जे जमीन अधिग्रहण केले जात होते त्याला जोरदार विरोध केला होता. त्यांनी सिंगूरला जाण्याचा हट्ट धरला होता. मात्र त्यांना सिंगूरला जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यानंतर तृणमुल काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार हंगामा केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात 3 डिसेंबर 2006 ला आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पा विरोधात मोठे आंदोलन उभे करत ते सुरू ठेवले.
या वादात हा प्रकल्प पश्चिम बंगालमधून थेट गुजरातच्या साणंदमध्ये गेला. त्यावेळी हा कारखाना 3340 ट्रक आणि पाचशे कंटनेरसह सिंगूर वरूण गुजरातच्या साणंद इथे पोहोचला. यामध्ये सात महिने गेले. तिथेच पुढे नॅनोचे उत्पादन सुरू झाले. 10 जानेवारी 2008 साली दिल्लीच्या प्रगती मैदानात आयोजित ऑटो एक्सपो मध्ये टाटा नॅनो पहिल्यांदा लोकांच्या समोर आली. टाटा नॅनोच्या बेसिक मॉडेलची किंमत एक लाख रूपये ठेवण्यात आली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की भारतीय नागरिकांना कमी किंमतीत चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले होते.
ट्रेंडिंग बातमी - Ratan Tata : रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
या कारला देशभरातू मोठी मागणी झाली. त्यासाठी लॉटरीही काढली गेली. एक लाख कार सुरूवातीला देण्याचे टाटा यांनी जाहीर केले. त्यासाठी जवळपास दोन लाख लोकांनी अर्ज केले होते. त्यातील एक लाखा लोकांना कारचे वाटप करण्यात आले. रतन टाटा यांनी मुंबईत पहिली टाटा नॅनो कारची चावी आपल्या हातानेच दिली होती. तो दिवस होता 17 जुलै 2009. त्या दिवशी त्यांनी कस्टम विभागाचे कर्मचारी अशोक विचारे यांना ही चावी दिली होती. 2009 साली नॅनो कार रस्त्यावर दिसू लागली. मात्र 2019 येता येता नॅनो कारची मागणी घटली. 2019 च्या आधी नऊ महिने एक ही नॅनो कार बनवली गेली नाही. त्या वर्षात फक्त एक युनिट विकले गेले. त्यानंतर या कारची निर्मिती पुर्ण पणे बंद करण्यात आली. आजच्या घडीला नॅनोची निर्मिती बंद आहे.