'या' शहरात दगडफेक गँगची दहशत, रात्री करतात वाहनांची तोडफोड

नाशिकच्या येवला शहरात दगडफेक गँगने धुमाकूळ घातला आहे. ही गँग रात्री उशिरा शहारतल्या घरासमोर उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक करते.

Advertisement
Read Time: 2 mins
नाशिक:

पुण्यात कोयता गँगची दहशत सर्वांनी पाहीले आहे. या कोयता गँगची दहशत एकीकडे असतानाच नाशिकच्या येवला शहरात दगडफेक गँगने धुमाकूळ घातला आहे. ही गँग रात्री उशिरा शहारतल्या घरासमोर उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक करते. यात गाड्यांच्या काचा फोडल्या जातात. या गँगकडून दगडफेक करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या दोन तीन महिन्यापासून रात्रीच्या वेळी येवला शहरातील पारेगाव रोड परिसरात पार्किंगमध्ये लावलेली वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात येत आहे. यात ते गाड्यांची नासधूस करून काचा फोडत आहे. शहरात आता पर्यंत अशा जवळपास आठ ते दहा घटना घडल्या आहेत.  मात्र याबाबत कोणी पुढे तक्रार करण्यास कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे हा प्रकार नक्की कोण करत आहे हे समजू शकले नाही. 

हेही वाचा - राजे की शिंदे? साताऱ्याचा खासदार कोण? बॅनरच झळकले

मात्र 20 तारखेला बाजीराव नगर भागात राहणाऱ्या डॉ. ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह आणखी एकाच्या कारवर अश्याच प्रकारे दगडफेक करून नासधूस करण्यात आली. डॉ. जगताप यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी परिसरातील  सीसीटीव्ही  चेक केले. त्यात त्यांना दगडफेक गँगचा उलगडा झाला. रात्रीच्या वेळी तीन ते चार तरुणांचं टोळकं रस्त्याने जाता - येता घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः पहाटेच्या सुमारास सर्व गाढ झोपेत असताना हे टोळके वाहनांच्या दगडाने काचा फोडण्याचा प्रताप करीत असल्याचे समोर आले.

हेही वाचा - दहावीच्या निकालाची तारीख ठरली; कुठे पाहू शकता निकाल?

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डॉ. जगताप यांनी दगडफेक करणाऱ्या अज्ञात समाज कंटकाविरोधात येवला शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नागरिकांच्या वाहनांची नासधुस करणाऱ्या या विकृत दगडफेक गँगचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी आता वाहनधारकातून होत आहे.पोलिसांनी आता सीसीटीव्हीच्या आधारे या दगडफेक गँगचा तपास सुरु केला आहे.

Advertisement