Pratap Sarnaik : तुम्हीही ओला-उबरच्या मनमानी भाड्याने हैराण आहात का? वाचा परिवहन मंत्र्यांनी काय केले

Strict action on Ola Uber cab drivers : प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Strict action on Ola Uber cab drivers : सरनाईक यांच्या आदेशानंतर कारवाई सुरु झाली आहे.
मुंबई:

Strict action on Ola Uber cab drivers : गेले काही दिवस मुंबई महानगर परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यांच्या या आदेशानंतर मोटार परिवहन विभागाकडून (RTO) तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे.

147 टॅक्सींवर कारवाईचा बडगा

परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतर गेल्या दोन दिवसांत आरटीओने जोरदार मोहीम राबवली. या कारवाईमध्ये एकूण 147 ॲप-आधारित टॅक्सी सेवांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 36 टॅक्सींनी प्रवाशांकडून सामान्य भाड्यापेक्षा कितीतरी जास्त भाडे आकारले होते. जिथे सामान्यतः 200 रुपये भाडे होते, तिथे त्यांनी 600 ते 800  रुपये घेतले होते.

( नक्की वाचा : Ganeshotsav 2025: बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; असा मिळणार विशेष पास )

परवाने रद्द करण्याचे निर्देश

अतिवृष्टीमुळे बस आणि लोकल रेल्वे सेवा ठप्प झाल्या होत्या. अशा वेळी प्रवाशांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना आर्थिक लुटणाऱ्या ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या टॅक्सी सेवांचे परवाने गरज पडल्यास रद्द करण्याचे निर्देशही मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत.

( नक्की वाचा : Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट राज्य सरकारच सुरु करणार खास सेवा! वाचा सर्व माहिती )

सरनाईक यांनी  मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी चर्चा करून सायबर सेलच्या मदतीनेही अशा ॲप-आधारित टॅक्सींवर कारवाई करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, मोटार परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने मुंबई आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article