Trending News: न्यूजपेपरच्या कागदात आता विकता येणार नाही वडापाव, तसं कराल तर थेट..., FDA चा मोठा निर्णय

तुम्ही जर वडापाव किंवा समोसा किंवा अगदी भेळसुद्धा वर्तमानपत्राच्या कागदावर घेऊन खाताय तर सावधान.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी हाती घेतल्यानंतर त्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे सर्वांचेच घाबे दणाणले आहेत. आता त्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे न्यूजपेपरच्या कागदावर वडापाव समोसा विकता येणार नाही. तसं केलं तर थेट जेलची हवा खावी लागणार आहे. आरोग्याच्या दृष्टीतून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या काळात तुम्हाला कुठेही पेपरवर वडापाव मिळणार नाही. आता वडापाव आणि समोसा विक्रेते याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करतात हे पहावे लागेल.  

तुम्ही जर वडापाव किंवा समोसा किंवा अगदी भेळसुद्धा वर्तमानपत्राच्या कागदावर घेऊन खाताय तर सावधान.  कारण ही सवय तुमच्या जीवाला धोका पोहोचू शकते. त्यामुळेच आता अन्न आणि औषध प्रशासन विभाग आता मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. वर्तमानपत्राच्या कागदावर समोसा किंवा वडापाव विकल्यास आता थेट जेलमध्ये रवानगी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे वडापाव विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना आता न्यूजपेपरला पर्याय शोधावा लागणार आहे. त्यावर वडापाव द्यावा लागणार आहे.  

Advertisement

नक्की वाचा - LPG price hike: महागाईचा भडका! सिलिंडर 29 रुपयांनी महाग, महाराष्ट्रातला दर किती?

अनेक ठिकाणी बरेच विक्रेते वडापाव, चाट, समोसा, ब्रेड पकोडा, भजी वर्तमानपत्राच्या पेपरमध्ये गुंडाळून देतात. मात्र जेव्हा वृत्तपत्रावर गरम किंवा तेलकट पदार्थ ठेवला जातो, तेव्हा शाई वितळते आणि थेट पदार्थाला चिकटते. ज्याने तो पदार्थ विषारी होतो. त्यामुळे तुम्ही आजारीही पडू शकता. तेव्हा अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा कागद वापरू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तरी ही न्यूजपेपरमध्ये समोसा, वडापाव दिल्यास थेट जेलमध्ये जावं लागणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने तसा इशारा दिला आहे. प्रशासन तेवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी मुंबईमधल्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यावर कारवाई केली आहे. 

नक्की वाचा - Trending News: पेट्रोल, डिझेल, गॅस संकटानंतर देशावर आता नवं संकट! यातून मार्ग कसा काढणार?

तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी स्विकारल्यानंतर धडक कारवाई राबवली आहे. त्यांनी गुटखा आणि पानमसालाविरोधात ही मोहीम हाती घेतली आहे. या कारवाई अंतर्गत 6 दिवासांत 203 छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये 102 जणांना अटक करण्यात आली आहे. तर राज्यभरातील जवळपास 68 दुकानं आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही असा थेट इशारा मुंडे यांनी दिला आहे. शिवाय आता जनतेला थेट तक्रार करण्याचं आवाहन ही त्यांनी केलं आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी शेअर करण्यात आला आहे.