दोन बसची समोरासमोर जोरदार टक्कर, अपघातात 20 जखमी 3 जण गंभीर

दोन बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. तर त्यातील 3 जणांची प्रकृती ह गंभीर आहे. जखमी मध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
वर्धा:

वर्धा जिल्ह्यातील केळझर इथं दोन बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. तर त्यातील 3 जणांची प्रकृती ह गंभीर आहे. जखमी मध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे. भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने एसटी बसला ही धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅव्हल्सची समोरची बाजू पुर्णपणे दबली गेली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सेलू येथील बृहस्पती मंदिरातून आजनसरा येथे खाजगी ट्रॅव्हल्स जात होती. ट्रॅव्हल्स केळझर इथल्या शहीद हरिभाऊ लाखे चौकात आली. त्याचवेळी समोरच्या बाजून एसटीची बस येत होती. ही बस वर्ध्यावरून नागपूरच्या दिशेन चालली होती. ट्रव्हल्सचा चालक गाडी भरधाव वेगाने चालवत होता. त्यावेळी त्याला चौकात आल्यानंतर एसटी बस दिसली नाही. त्याने थेट समोरून या एसटीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की एसटी आणि ट्रॅव्हल्सची समोरची बाजू पुर्ण पणे दबून गेली होती. 

हेही वाचा - अमरावतीच्या शेतकऱ्यांचे अनुदान गेलं काश्मीरात, नक्की काय घडलं?

अपघाताचा आवाज ऐकून अजूबाजूचे लोक मतदीसाठी धावून आले. त्यांनी बसमधील जखमींना बाहेर काढले. रस्त्यावरच त्यांना सुरूवातीला बसवण्यात आले. ट्रॅव्हल्समध्ये असलेले 16 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर एसटीतील 4 प्रवाशांना मार लागला आहे. तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. जखमीना सेलू, सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रॅव्हल्समधील सर्व जण हे टाकळघाट येथील रहिवाशी आहेत. 

Advertisement