Crime News : दोन तरुणांनी भररस्त्यात अडवून 18 वर्षीय तरुणीला संपवलं, घटना CCTV मध्ये कैद

Pimpri Chinchwad Crime News : कोमल जाधव असं मृत मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad News : 18 वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहे.  शहरातील वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाईनगर परिसरात ही घटना घडली. दोन तरुणांनी पाठलाग करुन तरुणीची धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा 

कोमल जाधव असं मृत मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी कोमलवर वार करत तिची हत्या केली. घटना एवढी भयंकर होती की या दुर्घटनेत कोमल चा जागीच मृत्यू झाला. कोमलची हत्या का झाली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

(नक्की वाचा: Political news: 'वादा पूर्ण करायचा नव्हता तर केलाच कशाला', सरकार विरोधात जानकर मैदानात)

हत्या केल्यानंतर हे तरुण परिसरातून फरार झाले. मात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. दोन्ही आरोपींनी हेल्मेट घातलेलं असल्याने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. पोलिसांनी या सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.  

(नक्की वाचा-  "वडिलांच्या हौतात्म्याचा बदला घेईन", शहीद वडिलांना निरोप देताना 11 वर्षांच्या मुलीचे उद्गार)

दिघीमध्ये 17 वर्षीय मुलाची हत्या

पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची जुन्या भांडणाच्या कारणावरुन हत्या करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सोहम सचिन शिंदे असं हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.  तर निलेश शिंदे, शुभम पोखरकर, सुमित शिंदे यांना अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article