UPI सेवा का ढेपाळली? Google Pay, Phone Pay, Paytm करण्यात अडचणी

ट्रँकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या आकड्यावरून संध्याकाळी सहा वाजता यूपीआई व्यवहार करताना जवळपास तीन हजार पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

युपीआय सेवा ढेपाळल्याचे बुधवारी दिसून आले. त्यामुळे Google Pay, Phone Pay, Paytm वरून व्यवहार करताना अनेकांना अडचणीचा सामना करावा लागला. त्यांना पैशांचा व्यवहारच करता आला नाही. अनेक जण सध्या ऑनलाईन पेमेंटवर भरोसा करतात. त्यामुळे ते रोख पैसे जवळ ठेवत नाही. पण युपीआय सेवा अचानक ठप्प झाल्याने त्याचा फटका अनेकांना बसला. शिवाय काय कारण आहे हे समजत नसल्याने अनेकांना मनस्ताप ही झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

युपीआय सिस्टम डाऊन झाल्यामुळे हा फटका युजर्सना बसला. त्यामुळे Google Pay, Phone Pay, Paytm वापरणाऱ्यांना काही काळासाठी ते वापरता आले नाही. संध्याकाळी सात वाजता ही अडचण समोर आली. त्यामुळे काही वेळासाठी खळबळ उडाली होती. पैसे ट्रान्सफर होत नाहीत त्यामुळे करायचे काय असा प्रश्न यावेळी अनेकांना पडला होता. काही जणांना ऑनलाईन व्यवहार करताना यूपीआय नेटवर्क नाही, असा मेसेज येत होता. 

ट्रेंडिंग बातमी -  Disha Salian: कोर्टाचा अवमान, 3 महिन्याची शिक्षा, दिशा सालियान केस लढणारे 'ते' निलेश ओझा कोण?

काही जणांचे या काळात व्यवहार करताना दोन वेळा पैसे कट झाल्याचे ही समोर आले आहे. तसा दावा युजर्स करत आहेत. मात्र ज्यांचे पैसे कट झाले आहेत ते 24 तासाच्या आत त्यांच्या खात्यात जमा होतात. ट्रँकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या आकड्यावरून संध्याकाळी सहा वाजता यूपीआई व्यवहार करताना जवळपास तीन हजार पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र काही वेळानंतर ही सेवा सुरळीत झाली आहे.