राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेचे एक एक कारनामे आता बाहेर येत आहेत. विशेष म्हणजे त्याच्यासह त्याची पत्नी, मुलगी आणि मुलगा हे घरातल्या सुनांबरोबर काय करत होते हे आता समोर आले आहे. वैष्णवी हगवणेची मोठी जाव मयुरी जगताप हगवणे हिने घरात काय काय घडत होतं याचा पाढाच वाचला आहे. हगवणे कुटुंबाच्या दहशतीची वैष्णवीच शिकार नव्हती तर मयुरीला ही तशाच पद्धतीचा त्रास सहन करावा लागत होता. पण ती वेळीच घरा बाहेर पडली म्हणून अजून पर्यंत जिवंत आहे असं ही ती आता सांगते. तिने माध्यमांशी बोलताना राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबाचा बुरखाच फाडला आहे. मनात संताप निर्माण होईल अशा घरातल्या गोष्टी तिनं सांगून हगवणे कुटुंबाचा खरा चेहरा समोर आणला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुयरी जगताप हीचं लग्न ही हगवणे कुटुंबात झालं होतं. लग्नानंतर दुसऱ्या महिन्यापासूनच तिचा छळ केला जात असल्याचं मयुरीने सांगितलं. साडी अशी का घालते? सासऱ्यांकडे बघते? यापासून सुरूवात झाली. नंतर छळ करण्याचे प्रमाण वाढत गेले. आमच्या घराचं वाटोळं केलं असं सासू म्हणायची. दिवाळीच्या दिवशीही भांडणं काढली. माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्लॅन केला जात होता. ते आपण ऐकले. त्यावरून सासरे राजेंग्र हगवणे याने आपल्याला मारहाण करत कपडे फाडल्याचा आरोप मयुरीने केला आहे. त्यानंतर दिल शशांकने आपल्याला खाली पाडून केस ओढून मारहाण केली होती. सासू आणि नणद करिश्मानेही आपल्याला मारहाण केली असं मयुरी सांगते.
त्यानंतर आपला मोबाईल हिसकावून घेण्यात आला. त्याच मोबाईलमध्ये आपण सर्वा काही रेकॉर्ड केले होते असं तिने सांगितलं. घरातले लोक मला जिवंत ठेवणार नव्हते, हे आपल्या पतीला समजलं होतं. त्यामुळे आम्ही त्या घरातून बाहेर पडलो असं मयुरी सांगते. ते लोक कोणत्याही पातळीला जावू शकतात. ते विचित्र लोक आहेत असं ही ती म्हणाली. वैष्णवी लग्न करून आल्यानंतर तिला माझ्याशी बोलू दिलं जात नव्हतं. आपल्या विरूद्ध तिला भडकवलं जात होतं. ती शांत स्वभावाची होती. ती सर्व काही सहन करत होती. तिला मारहाण होते, छळ होतो हे घरातल्या नोकरांकडून समजत होतं असं ही मयुरीने सांगितले.
सख्खी जाव असून आम्ही कधीच एकमेकींशी बोललो नाही असं ही मयुरीने सांगितले. वैष्णवीला नेहमी जाच होत होता. ती सर्व काही सहन करत होती. पण मी त्यांना प्रत्युत्तर देत होते. मला कुणी थांबवलं नाही. आम्हला दिर आणि नंदेकडून जाच होत होता. वैष्णवीला होणारा त्रास आम्हाला पाहावत नव्हता. फॉर्च्यूनर गाडी आपल्या समोरच मागितली होती. ती ही सासून मागितल्याचं मयुरीने सांगितलं. माझ्या नवऱ्याला ही त्यांनी त्रास दिला असं ही ती सांगते. हगवणे हे राजकीय कुटुंब आहे. त्यामुळे ते वारंवार पोलिसांवर दबाव आणायचे असं ही ती म्हणाले. दरम्यान वैष्णवीचं बाळ मी मागितलं होतं. पण मला ते देण्यात आलं नाही असं ही तिने सांगितलं.