- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज ठप्प केले आहे
- वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे
- दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीमान्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प केले आहे. तर संसदेबाहेर कॉक्रोज जनता पार्टीने सरकारचे टेन्शन वाढवले आहे. त्यात आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. वेगवेगळ्या स्तरातून त्याचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. वंचित बहुजन आधाडीने ही बंदची हाक दिली आहे. शिवाय समविचारी पक्षांनी यात सहभागी व्हावे असं आवाहन ही करण्यात आलं आहे. त्यामुळे या बंदमध्ये कोण कोण सहभागी होतं ते पाहवं लागणार आहे.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला. पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने 23 जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी ते म्हणाले की मी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन 23 जुलैच्या 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा द्यावा. त्यामुळे या बंदमध्ये महाराष्ट्रातील कोण कोण सहभागी होतं याची उत्सुकता लागली आहे. मात्र राज्या वेगवेगळ्या ठिकाणी आतापासून आंदोलने होत आहेत.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी तीव्र निषेध केला आहे. या घटनेवरून त्यांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित राहिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच 23 जुलै रोजी राज्यभर आणि देशभर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये विद्यार्थी, सुजाण नागरिक आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोकशाही व संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी हा बंद महत्त्वाचा असल्याचेही पातोडे यांनी म्हटले. दिल्लीत काँग्रेसने मंगळवारी जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर काँग्रेस नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थाना बाहेरच धरणे आंदोलन केले. त्यामुळे तिथेल वातावरण तणावपूर्ण झाले होते. शेवटी राहुल गांधी यांना बळाचा वापर करत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या सोबत प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांना ही ताब्यात घेण्यात आलं.