Video: बिथरलेला रेडा थेट दुकानात घुसला! दुचाकीला धडक, मुलांचा जीव मुठीत, दहशतीचा थरार CCTV मध्ये कैद

पाहाता पाहाता तो दुकानात घुसणार हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यातील काही महिलांनी चालाखी दाखवली.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन नाक्याजवळ रेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला
  • बिथरलेल्या रेड्याने दुकानांकडे धाव घेतली, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
  • रेडा दुकानात घुसला त्यावेळी महिलांनी मागच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नालासोपारा:

मनोज सातवी

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन नाका येथे आज भर गर्दीच्या परिसरात बिथरलेल्या रेड्याने हैदोस घातला. बिथरलेल्या रेड्याने रस्त्याने जात असलेल्या एका दुचाकीस्वारावर हल्ला केला.  रेड्याने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. गाडीचे ही नुकसान झाले. रेडा बिथरला आहे हे लक्षात आल्यानंतर लोकांची ही एकच धावपळ उडाली. त्या रेड्याला कुणीही नियंत्रणात करत नव्हतं. दिसेल तिथे रेडा पळत होता. त्याने आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर फुटपाथवर विक्री करत असलेल्यांकडे मोर्चा वळवला. तिथून ही काही लोकांनी पळ काढला.  

ज्या ठिकाणी हे सर्व घड होतं तिथे रहदारी असतो. मार्केट एरिआ असल्याने ही दुकानं भरपूर आहेत. रेडा पिसाळला आहे या मुळे रस्त्यावरचे लोक भयभीत झाले होते. त्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. काही जण प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या दुकानात शिरले. त्यात काही महिला आणि लहान मुलींचा समावेश होता. त्या पळत पळत दुकानात घुसल्या. त्यांच्या मागे काही लोक ही आले.  त्यांच्या मागेच तो राडा धावू लागला. पाहाता पाहाता तो दुकानात घुसणार हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यातील  काही महिलांनी चालाखी दाखवली. 

नक्की वाचा - Rapido bike ban: रॅपिडोला सरकारचा दणका! थेट परवानाच रद्द, काय घडलं, कारण काय?

त्यांनी दुकानाच्या मागच्या बाजूला जाण्याचे ठरवले. त्यांचा तो निर्णय जीव वाचवणारा ठरवा. त्या महिलेच्या मागे इतर मुली ही गेल्या. त्या ज्या ठिकाणी उभ्या होत्या त्याच ठिकाणी रेड्याने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की संपूर्ण दुकान हादरलं. त्या महिला आणि मुली तिथेच उभ्या राहील्या असत्या तर कदाचीत त्यांच्या जीवावर बेतले असते. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यावेळचा थरार आणि दहशत या व्हिडीओतून स्पष्ट पणे दिसत आहे. ज्या दुकानात रेडा घुसला त्या दुकानाचे मोठे नुकसान झाले. 

नक्की वाचा - Rohit Sharma Video: भर मैदानात रोहित शर्मा बायकोवर खेकसला, दोघांची हमरी-तुमरी कॅमेऱ्यात कैद, Video Viral

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला.  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यामध्ये रेडा बाजारात धावताना आणि दुकानात घुसतानाचे भीतीदायक दृश्य स्पष्ट दिसत आहे. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी भर गर्दीच्या बाजारात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement