Western Railway Mumbai-Surat Line Affected : बोईसर आणि वानगाव स्टेशनदरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंटमध्ये (OHE) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईहून सुरतकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक गाड्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
या एक्स्प्रेस आणि लोकल विलंबाने धावत आहेत
93033 क्रमांकाची डहाणू रोड लोकल बोईसर स्टेशनवर थांबली आहे.
22955 क्रमांकाची वांद्रे टर्मिनस-भुज कच्छ एक्सप्रेस पालघर येथे थांबवण्यात आली आहे.
12921 क्रमांकाची मुंबई सेंट्रल - सुरत फ्लाइंग राणी एक्सप्रेस पालघर येथे थांबली आहे.
93035 क्रमांकाची डहाणू रोड लोकल केळवे रोड येथे थांबली आहे.
59023 क्रमांकाची मुंबई सेंट्रल - वलसाड पॅसेंजर केळवे रोड येथे थांबली आहे.
12903 क्रमांकाची मुंबई सेंट्रल - अमृतसर गोल्डन टेंपल मेल सफाळे येथे थांबली आहे.
12431 क्रमांकाची त्रिवेंद्रम - ह. निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस वसई रोड येथे थांबली आहे.
12955 क्रमांकाची मुंबई सेंट्रल - जयपूर एक्सप्रेस वसई रोड येथे थांबली आहे.
12971 क्रमांकाची वांद्रे टर्मिनस - भावनगर एक्सप्रेस बोरीवली येथे थांबली आहे.
22943 क्रमांकाची दौंड - इंदूर एक्सप्रेस कामन रोड येथे थांबली आहे.
रेल्वे प्रशासन तातडीने दुरुस्तीचे काम करत असून, लवकरच वाहतूक पूर्ववत होण्याचा अंदाज आहे. यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.