IAS Manisha Mhaiskar Interview : प्रशासकीय कामकाज करताना इतकी मोठ्या स्वरूपातील आव्हानं असतात,अशा परिस्थितीत कौंटुबिक जबाबदारी कशी सांभाळली जाते? कारण स्त्रियांना घरात ठेवणं की घरातल्या चौकटीत अडकवणं,अशावेळी ती फक्त घर सांभाळत नाही,तर तुम्ही आता गृहविभाग सांभाळत आहात. तर हे कसं चॅलेंजेस आहे? यावर प्रतिक्रिया देताना राज्याच्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या,"ते आव्हानात्मक आहे. यामध्ये मी दोन गोष्टी शिकले.एक म्हणजे आपल्याला टाईम मॅनेजमेंट करता आली पाहिजे. मी दरदिवशी सकाळी किंवा दर आठवड्याच्या सुरुवातीला काय काय करायलं पाहिजे, हे माझ्यासमोर एक चित्र असतं.टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं ठरतं. मी असं समजले की मी शंभर गोष्टी करेन, तर मी कोणतीच गोष्टी चांगली करू शकणार नाही.पण जर मी ठरवलं की या शंभर गोष्टींपैकी मी या दहाच गोष्टी करेन,पण मी ते उत्तमपणे करेन". म्हैसकर एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होत्या.
"आई वडिलांनी त्या मुलीला जर सक्षमतेचे धडे दिले,तर.."
"मुलगी जेव्हा जन्मते,तेव्हा ती जन्मत: शक्ती असते. महत्त्वाचं असंत की, आई-वडिलांनी त्या मुलीला जाणीव करून द्यावी की ती सक्षम आहे. ती समान आहे म्हणून..जी मुलगी या पोषक वातावरणात वाढते, ती खरच अनस्टॉपेबल होते.तेच उदाहरण आपण प्रशासनात देऊ शकतो.आताच सीएम सर येऊन गेले.नारीशक्तीसाठी प्रशासन जेव्हा पोषक असतं,तेव्हा प्रत्येक महिलेला सर्वात चांगल्या गोष्टी कशा करता येतील,हे प्रयत्न करता येतात.यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते,असं आपण म्हणतो.पण एखाद्या महिलेला जर पुढे जायचं असेल, तर अख्ख कुटुंब तिला साथ द्यायला लागतं. मुलगी लहानपणी जेव्हा तिच्या आई-वडिलांकडे असते..आई वडिलांनी त्या मुलीला जर सक्षमतेचे धडे दिले,तर तिला पुढे कोणीच थांबवू शकत नाही. पण आपली स्टोरी इथे थांबत नाही. त्या मुलीचं जेव्हा लग्न होतं,तेव्हा सासरच्या घरी पण तिला सक्षम सून आली आहे, असं जर स्वीकारलं,तर ती मुलगी मग अजून अनस्टॉपेबल होते",असंही मनीषा म्हैसकर म्हणाल्या.
नक्की वाचा >> "आम्ही 1500 रुपये आता देतोय, पुढे 2100 रुपये देऊ,पण..", लाडकी बहीण योजनेबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान
"माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं,तर मला एक लहान भाऊ आहे. माझ्या आई-वडिलांनी माझ्यात आणि माझ्या भावात कधीच भेदभाव केला नाही. माझ्या आई-वडिलांबद्दल असं म्हटलं जायचं की, ज्या काळात (1980) अन्य आईबाबांचं स्वप्न आएएस (IAS) जावई हे असायचं.त्या काळात माझ्या आईबाबांनी मला आयएएस व्हायचं स्वप्न दाखवलं. त्यानंतर माझा जो जोडीदार आहे मिलिंद,त्यानेही माझ्याकडे इक्वल पार्टनर म्हणून पाहिलं.माझ्या सासरचाही यात मोलाचा वाटा आहे, असं मी समजेल", असंही म्हैसकर म्हणाल्या.