महिलेला 10 वर्षानंतर मुंबई लोकलमध्ये भेटली शाळेतील कडक शिक्षिका, व्हिडीओ पाहून विद्यार्थी म्हणाले, या बाईंनी..

जुने शिक्षक-शिक्षिका अचानक समोर आले, की या आठवणी काही क्षणांत डोळ्यांसमोर उभ्या राहतात.असंच काहीसं एक महिलेच्या बाबतीत मुंबईच्या ट्रेनमध्ये घडलं. दोघींचा व्हिाडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावतील.

जाहिरात
Read Time: 2 mins
Woman And School Teacher In Mumbai Local Video
मुंबई:

Woman With Old Teacher Video Viral :  बदलत्या काळानुसार प्रत्येकाच्या जीवनाचा गाडा पुढे सरकत असतो.पण बालपणीच्या आठवणी मात्र मनात कायम घर करून राहतात. विशेषत:शालेय जीवनातील अनेक किस्से आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आठवतात. मग ते शिक्षकांचं प्रेम असो वा मित्रांसोबत एन्जॉय केलेले अप्रतिम क्षण. पण शाळेतील कडक शिक्षकांच्या आठवणी अधूनमधून ताज्या होत असतात. कारण हातावर मारलेली छडी किती जोरात लागली, हे आजही अनेकजण शाळेतल्या मित्रांना सांगतात. जुने शिक्षक-शिक्षिका अचानक समोर आले, की या आठवणी काही क्षणांत डोळ्यांसमोर उभ्या राहतात.असंच काहीसं एक महिलेच्या बाबतीत मुंबईच्या ट्रेनमध्ये घडलं. एक महिलेला तिच्या शाळेतील कडक शिक्षिका भेटल्यावर जे काही घडलं, तो क्षण इन्स्टाग्राम व्हिडीओवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्यच वाटलं आहे.

तब्बल 10 वर्षांनी मुंबई लोकलमध्ये भेट झाली अन्..

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक महिला आणि तिच्या शाळेतील जुन्या शिक्षिकेची तब्बल 10 वर्षांनी मुंबई लोकलमध्ये भेट झाली. दोघांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. शाळेतील वर्गात सतत ओरडणाऱ्या कडक शिक्षकाला कोणालाही भेटावसं वाटत नाही. पण या व्हिडीओमुळे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. असे जुने शिक्षक जर दहा वर्षांनी भेटत असतील तर तो क्षण नक्कीच आनंददायी वाटतो. मुंबईल लोकलमधील एका महिलेचा आणि शिक्षिकेचा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ लोकांचं मन जिंकत आहे. 

"माझ्या कडक शिक्षिकेला भेटा

हा व्हिडीओ @krupaya.rahate नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.या व्हिडीओत दिसतंय की, एक महिला तिच्या शिक्षिकेला करिअरबद्दल सांगत असते. महिलेनं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, "माझ्या कडक शिक्षिकेला भेटा".महिलेचं बोलणं ऐकूण शिक्षिका सतत हसत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सला त्यांच्या शिक्षकांची आठवण झाली आहे.व्हिडीओ पाहून एका यूजरने म्हटलंय,"आठवणी ताज्या झाल्या."दुसऱ्या एकाने म्हटलं,"जबरदस्त क्षण आहे".या शिक्षिकेचा अन्य एका विद्यार्थ्याने म्हटलं, "त्यांना कधी हसताना पाहिलंच नव्हतं."

Advertisement