मुंबईच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर हल्ला, आरोपी फरार

 Female Doctor attacked in Mumbai : कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभर संतापाचं वातावरण असताना मुंबईतही महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

 Female Doctor attacked in Mumbai : कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभर संतापाचं वातावरण असताना मुंबईतही महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील प्रसिद्ध सायन हॉस्पिटमध्ये महिला डॉक्टरवर पेशंट्सच्या नातेवाईकांनी हल्ला केला. यावेळी महिला डॉक्टर स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाली रविवारी पहाटे ही घटना घडली. या प्रकरणात  बीएमसी एमएआरडी असोसिएशनच्या डॉक्टरांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. 
 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

सायन हॉस्पिटलमध्ये रविवार म्हणजे 18 ऑगस्टर रोजी ही महिला डॉक्टर वॉर्डमध्ये ड्यूटी करत असताना हा प्रकार घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरवर हल्ला करणारे सर्वजण नशेत होते.

आरोपींनी महिला डॉक्टरला धमकी देखील दिली. या घटनेनंतर पेशंट आणि त्याचे नातेवाईक फरार झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकातामधील ट्रेनी डॉक्टरची बलात्कार आणि हत्या झालेल्या घटनेनं देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टरांच्या शिष्टमंडळानं आरोग्य विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या मागण्या सादर केल्या आहेत. त्याचवेळी सायन हॉस्पिटलमधील घटनेनं डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. 

( नक्की वाचा : 'छातीवर टायर... तो त्रासानं ओरडत होता...' वर्सोवा हिट अँड रनमध्ये नेमकं काय घडलं? )
 

डॉक्टरांच्या मागणीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काही दिवसांपूर्वी सर्व सरकारी हॉस्पिटलसाठी निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार हॉस्पिटल परिसरात कर्मचारी आणि आरोग्य कार्यकर्त्यांच्या विरोधात घडलेल्या कोणत्याही हिंसाचाराची सहा तासांच्या आत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेत ही तक्रार दाखल झाली नाही तर संबंधित संस्थानाच्या प्रमुखांना जबाबदार धरलं जाईल, असं या निर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. 

Advertisement