Who is Shefali Bagga: धनश्री,महवश आणि आता शेफाली? युजवेंद्रची नवी मैत्रीण आहे तरी कोण?

Yuzvendra Chahal Spotted With Shefali Bagga: काळ्या शर्टातील कॅज्युअल लूकमध्ये चहल कूल दिसत होता, तर काळ्या वन-पीसमध्ये शेफालीने सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • युजवेंद्र चहल मुंबईत बिग बॉस फेम शेफाली बग्गासोबत दिसला.
  • चहल आणि आरजे महवश यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा
  • चहलने पापाराझींना शेफालीसोबत फोटो काढण्यास नकार दिला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. टीम इंडियाचा हा लाडका खेळाडू शनिवारी संध्याकाळी मुंबईत 'बिग बॉस 13' (Bigg Boss 13) फेम अभिनेत्री आणि न्यूज अँकर शेफाली बग्गा (Shefali Bagga) हिच्यासोबत दिसला होता.  विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून चहल आणि आरजे महवश (RJ Mahvash) यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत युजवेंद्र आणि शेफाली एकत्र दिसल्याने हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.  युजवेंद्र आणि महवशने  इंस्टाग्रामवर एकमेकांना 'अनफॉलो' केले आहे, त्यातच युजवेंद्रच्या आयुष्यात शेफालीची एन्ट्री झाली आहे.  

युजवेंद्रचा शेफालीसोबत फोटो काढण्यास नकार

मुंबईच्या एका भागात चहल आणि शेफाली एकत्र दिसले होते. काळ्या शर्टातील कॅज्युअल लूकमध्ये चहल कूल दिसत होता, तर काळ्या वन-पीसमध्ये शेफालीने सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मात्र, खरी चर्चा सुरू झाली ती चहलच्या वागण्यामुळे. पापाराझींनी जेव्हा त्यांना "एकत्र पोज द्या" अशी विनंती केली, तेव्हा चहलने कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून काढता पाय घेतला. शेफालीसोबत एकही फ्रेम शेअर न करता चहलने मारलेली ही 'एक्झिट' बरंच काही सांगून जात असल्याची चर्चा आता रंगली आहे.

कोण आहे ही शेफाली बग्गा? 

शेफाली बग्गा हे मनोरंजन विश्वातील परिचयाचे नाव आहे. 'बिग बॉस 13' द्वारे ती घराघरात पोहोचली होती. शहनाज गिलसोबतची तिची मैत्री आणि तिची स्टाईल यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ती एक यशस्वी कंटेंट क्रिएटर आणि टीव्ही होस्ट म्हणून कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वीच चाहत्यांच्या लक्षात आले की चहल आणि महवशने एकमेकांना इंस्टाग्रामवर 'अनफॉलो' केले आहे. इतके महिने एकत्र फिरणारे, एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स करणारे हे दोघे अचानक 'अनफॉलो' का झाले? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच महवशने नुकतीच एक गुडघ्यापर्यंत केस नीट करत असल्याची स्टोरी शेअर केली आणि त्यात "आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करतेय" (Fixing my life) असे सूचक कॅप्शन दिले होते. यावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.   
 

Advertisement
Topics mentioned in this article