अनाया बांगर RCB कडून खेळणार? Video शेअर करत दिली मोठी अपडेट, सराव करताना मारले जबरदस्त शॉट्स

Anaya Bangar With RCB Kit Viral Video :  भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर, जो आता अनाया बांगर या नावाने ओळखली जातो. अनाया आरसीबी टीममधून खेळणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Anaya Bangar Playing Cricket
मुंबई:

Anaya Bangar With RCB Kit Viral Video :  भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर, जो आता अनाया बांगर या नावाने ओळखला जातो, पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच अनाया बांगरने सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ शेअर केला ज्याने अनेकांना भावूक केलं. या व्हिडीओमध्ये अनाया पुन्हा क्रिकेट किट घेऊन मैदानात सराव करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनाया पॅडअप करून मैदानात उतरली आणि तिने एकाहून एक जबरदस्त शॉट्स मारण्याचा सराव केला. अनाया बांगरने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती मैदानाकडे जाताना दिसते, पॅड आणि ग्लोव्ह्ज घालून फलंदाजीसाठी सज्ज होते.

व्हिडीओ शेअर करत अनाया बांगर काय म्हणाली?

"माझी दुनिया बदलली, पण स्वप्न कधीच बदललं नाही. मी माझ्या रक्तात क्रिकेट घेऊन जन्माला आले होते आणि आता, मी ते माझ्या सत्यात जगते."अनन्याच्या या पोस्टला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांनी आणि क्रिकेटप्रेमींनी तिचं धैर्य आणि जिद्दीचं कौतुक केलं आहे. यासोबतच एक चर्चा जोर धरू लागली आहे की, अनाया बांगर भविष्यात RCB (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) संघाकडून खेळताना दिसेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण अनाया बांगर व्हिडीओमध्ये RCB संघाच्या किट बॅगसह सरावासाठी मैदानात गेल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

इथे पाहा अनाया बांगरचा क्रिकेट खेळतानाचा जबरदस्त व्हिडीओ

आर्यन बांगर या नावाने लहानपणापासून क्रिकेट खेळलं आणि देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. नंतर त्याने आपली ओळख बदलली आणि अनाया बांगर या नावाने नवीन आयुष्याची सुरुवात केली. आता ती एक ट्रान्सजेंडर महिला आहेत आणि अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. मात्र क्रिकेटबद्दल तिचं प्रेम आजही तितकंच आहे. तिचा हा व्हिडीओ हे सूचित करतो की, ती पुन्हा एकदा आपल्या क्रिकेट कारकिर्दीला नव्याने सुरूवात करण्याच्या तयारीत आहेत.

महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर देशभरात महिला खेळाडूंचं कौतुक होत आहे. याच प्रेरणेतून कदाचित अनाया बांगरनेही आपल्या बालपणीच्या स्वप्नाला पुन्हा जागं करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय केवळ ट्रान्सजेंडर समुदायासाठी नव्या आशेचा किरण नाही, तर हेही दर्शवतो की जिद्द आणि स्वप्नं कधीच जेंडरच्या सीमेपुरतं मर्यादीत राहत नाहीत.