दक्षिण अफ्रीकेने भारता विरुद्धची दुसरा कसोटी सामना तब्बल 408 धावांनी जिंकला. त्यांनी या सामन्यासह मालिकाही 2-0 ने जिंकत टीम इंडियाला घरच्या मैदानावर व्हाईट वॉश दिला. न्यूझिलंडनंतर दक्षिण अफ्रिकेनेही भारताला घरच्याच मैदानावर पराभवाची धुळ चारली आहे. भारताच्या या पराभवामुळे दक्षिण अफ्रिकेने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताच्या क्रमवारीत घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत फायनलमध्ये जाण्यासाठी या पुढच्या काळात होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे.
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया 100 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी चार टेस्ट खेळल्या असून चारही सामने जिंकले आहेत. त्यांच्यानंतर दक्षिण अफ्रिकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अफ्रिकेने चार सामने खेळून तीन सामने जिंकले आहे. तर एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. दक्षिण अफ्रिकेचे ऑस्ट्रेलिया पाठोपाठ 75 पॉईंट्स आहेत. विशेष म्हणजे सध्याच्या स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा संघ आहे. श्रीलंकेने दोन सामने खेळले आहे. त्यात एक जिंकला आहे तर एक टेस्ट मॅच ड्रॉ केली आहे. त्यामुळे त्यांचे पॉईंट्स 66.67 असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
नक्की वाचा - IND Vs SA: दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियाचे लोटांगण, 408 धावांनी लोळवलं, मालिकाही जिंकली
श्रीलंकेनंतर पाकिस्तनानने बाजी मारली आहे. ते सध्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी दोन सामने खेळले आहेत. त्यात एक विजय एक पराभव आहे. त्यांचे 50 पॉईंट्स आहेत. पाकिस्ताननंतर भारताचा क्रमांक लागला आहे. भारताने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. त्यातील चार सामने जिंकले आहेत तर चार सामन्यात पराभव स्विकाराला लागला आहे. एक सामना हा अनिर्णित राहीला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे 48.15 पॉईंट्स असून पाचव्या क्रमाकांवर आहे. भारताला येणाऱ्या काळात ही कामगिरी सुधारावी लागेल. त्यानंतर ही स्थिती नक्कीच सुधारेल.
विशेष म्हणजे सर्वाधिक सामने भारतीय संघानेच खेळले आहे. त्यानंतर सर्वाधिक सामने हे इंग्लंड संघाने खेळले आहे. त्यांनी सहा सामने खेळले आहेत. त्याच दोन सामने जिंकले तर तिन सामन्यात पराभव झाला आहे. एक टेस्ट ड्रॉ झाली आहे. इंग्लंड सहाव्या क्रमांकावर असून त्यांचे 26 पॉईंट्स आहेत. इंग्लंडनंतर बांग्लादेश, वेस्ट इंडिज आणि न्यूझिलंडचा क्रमांक लागला आहे. दरम्यान भारताने मायदेशातच सिरीज गमावणे हा मोठा टीम इंडियाला मोठा धक्का समजला जात आहे. त्यामुळे आगामी काळात कामगिरी सुधारण्याचा दबाव संघावर निश्चितच असेल.