मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातला सामना वानखेडी स्टेडीयमवर रंगला. या सामन्यात मुळचा मुंबईकर असलेल्या आयुष म्हात्रेला चेन्नईकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. आयपीएलमधला त्याचा हा पहिलाच सामना होता. शिवाय तो घरच्या मैदानावर खेळण्याची संधी 17 वर्षाच्या आयुशला मिळाली. त्याने या संधीचे सोने करत लहान वयात आपला जलवा वानखेडे स्टेडियमवर दाखवला. छोटा पॅक बडा धमाका अशीच चर्चा त्यामुळे वानखेडे स्टोडीयमवर रंगली होती. राजस्थान रॉयल्स कडून खेळताना वैभव सुर्यवंशीने शनिवारी धमाकेदार सुरूवात केली. अवघ्या 14 वर्षाच्या वैभवने 20 चेंडूत 34 धावा ठोकत आपल्या पदार्पणाच्या सामन्यात आपली दखल सर्वांनाच घ्यायला लावली होती. त्या पाठोपाठ आयुषनेही आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयुष म्हात्रेला चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. चेन्नईने ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर त्याला संघात संधी देण्यात आली होती. कर्णधार एम. एस धोनीने राहुल त्रिपाटीला संघातून वगळले. त्याच्या ऐवजी त्याने आयुष म्हात्रेला संघात स्थान दिले. आयुशनेही धोनीचा विश्वास सार्थ ठरवला. त्याला रचिन रविंद्र या सामन्यात केवळ 5 धावा काढून बाद झाला. त्यानंतर चौथ्याच षटकात आयुष फलंदाजीसाठी आला. त्याचे हे तसे घरचे मैदान होते. घरच्या प्रेक्षकां समोर तो मुंबईच्याच टीमला भिडणार होता. त्यामुळे 17 वर्षाच्या आयुषकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: दिमाखदार विजय.. पण एक चूक भोवली, शुभमन गिलला BCCIचा दणका
त्यानेही मुंबईकरां बरोबरच चेन्नईला नाराज केले नाही. त्यांनी धमाकेदार खेली करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले. त्याने 15 चेंडूंचा सामना करत 32 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्या याखेळीत त्याने दोन सिक्स आणि 4 कडक चौकार लगावले. पदार्पणातच त्याने केलेल्या या खेळीने सर्वच जण प्रभावीत झाले. धोनीने ही त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटला. शिवाय त्याने मुंबईकरांचीही मनं जिंकली. त्याला दीपक चाहरने बाद केले. त्याच्या या छोटे खानी खेळीने छोटा पॅक बडा धमाका अशी चर्चा वानखेडेवर रंगली होती. वैभवनंतर आयुषनेही आपली छाप आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात सोडली आहे.
ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: बंगळुरूचा पंजाबवर रॉयल विजय, कोहलीला सुर गवसला
आयुष म्हात्रे हा मुंबईचा राहाणार आहे. त्याने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आयुष म्हात्रेने गेल्या वर्षी इराणी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या रणजी संघासाठी सलामीवीर म्हणून पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 9 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. त्याच वेळी, त्याने 7 लिस्ट ए सामन्यांमध्ये 65 च्या सरासरीने 458 धावा ही ठोकल्या आहेत. आता त्याने आपली छाप आयपीएलमध्ये