आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) स्पर्धेतील सातवा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (Autralia VS South Africa Cricket Match Update) खेळवण्यात येणार होता. हा सामना पावसाला सुरुवात झाल्यामुळे वेळेवर सुरू होऊ शकला नव्हता. पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये (Rawalpindi Cricket Stadium Weather) हा सामना खेळवण्यात येत होता आणि रावळपिंडीमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. मैदान ओलं असल्याने वेळेवर टॉस होऊ शकला नाही. नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राखीव दिवस नाही
चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. ग्रुप सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणे अपेक्षित होते, मात्र पावसामुळे तो वेळेवर सुरू होऊ शकला नाही. एक तास उलटून गेल्यानंतर सामन्यासाठीची षटके कमी करण्यास सुरुवात केली जाते. एकदिवसीय सामन्यामध्ये निकाल लावायचा असेल तर दोन्ही संघांनी 20 षटके खेळणे गरजेचे असते. पाऊस थांबण्याची शक्यता नसल्याने अखेर आजचा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नक्की वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट; खेळाडूंच्या अपहरणाचा कट?
'ग्रुप बी'चं समीकरण कसं असेल?
चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेतील आता या चारही संघांसाठी रन रेट महत्त्वाचा असणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना पावसात वाहून गेल्याची बातमी इंग्लंड आणि अफगाणिस्तानसाठी सुखावणारी ठरली आहे. कारण या दोन्ही संघांची पुढची वाट काहीशी सोपी झाली आहे. या दोन्ही संघांना त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकणं आणि चांगला रन रेट राखणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांचा पुढील सामना जिंकला की त्यांची सेमी फायनलची वाट फारशी कठीण राहणार नाही. आता हे दोन्ही संघ सेमी फायनलमध्ये पोहोचतात की दोघांपैकी एक संघ सेमी फायनलमध्ये पोहोचतो याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे.
'ग्रुप बी'च्या तुलनेत 'ग्रुप ए' चं समीकरण सुस्पष्ट झालं आहे. भारत आणि न्यूझीलँडच्या संघाने सेमी फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या दोन संघांचा सामना 'ग्रुप बी'मधल्या कुठल्या संघाशी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की सेमी फायनलपैकी एकच सामना पाकिस्तानात होणार आहे.