'सरनेममुळे सर्फराज खान बाहेर...?',इंडिया-A टीममध्ये निवड का झाली नाही?,शम्मा मोहम्मद यांनी गंभीरला सुनावलं!

Shama Mohamed react on Sarfaraz Khan :  टीम इंडियाच्या ए संघात सर्फराज खानची निवड न झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.  काँग्रेसच्या महिला नेत्या शमा मोहम्मद यांनी सर्फराज खानच्या इंडिया-ए संघातील निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Shama Mohamed react on Sarfaraz Khan :  टीम इंडियाच्या ए संघात सर्फराज खानची निवड न झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.  काँग्रेसच्या महिला नेत्या शमा मोहम्मद यांनी सर्फराज खानच्या इंडिया-ए संघातील निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. "सरनेममुळे सर्फराज खानची निवड झाली नाही का?, आम्हाला माहितीय,अशा प्रकरणांमध्ये गौतम गंभीरचा काय भूमिका असते",असं ट्वीट करत शमा मोहम्मद यांनी हल्लाबोल केला आहे. शमा यांचं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावरही साधला होता निशाणा

सर्फराज खानला संघात सामील न केल्याने शमा मोहम्मद यांनी या विषयाला राजकीय वळण लावलं आहे. शमा मोहम्मद भारतीय क्रिकेटर्सबाबत नेहमीच पोस्ट शेअर करत असतात. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रोहित शर्माच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले होते. रोहित शर्मा फिट नाही. तो लठ्ठ आहे, असं म्हणत शमा यांनी रोहितवर निशाणा साधला होता. पण त्यानंतर शमा मोहम्मद यांनी त्यांचं विधान मागे घेत माफी मागितली होती. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर शमा मोहम्मद यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या होत्या.

नक्की वाचा >> Video :"रतन टाटाजी माझ्या कंपनीत..",महिला ताज हॉटेलच्या मॅनेजरवर भडकली, बसण्याच्या स्टाईलमुळे झाला वाद अन्..

दुसरीकडे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सर्फराजची संघात निवड न झाल्याबद्दल सवाल उपस्थित केले होते. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सतत चांगली कामगिरी केल्यानंतरही सर्फराजला टीम इंडियाच्या ए संघात का निवडलं नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सर्फराज खानने मागील 5 वर्षात 117.47 च्या सरासरीनं 5 अर्धशतक आणि 10 शतकी खेळी केल्या होत्या.

त्याने एकूण 2467 धावा केल्या आहेत.तसच सर्फराज खानने 17 किलो वजन कमी केलं आहे. सर्फराजने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये आतापर्यंत 6 टेस्ट सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीनं 371 धावा केल्या आहेत. त्याने गतवर्षी न्यूझीलंड विरोधात भारतासाठी शेवटची सीरिज खेळली होती. त्यावेळी त्याने शतकी खेळीही केली होती. 

Advertisement

नक्की वाचा >> "पुणे कोणाच्या बापाचं नाही..परत या", पुण्यात 'स्थानिक विरुद्ध बाहेरील' वाद पेटला..'ते' पोस्टर प्रचंड व्हायरल!