Shubman Gill creates History: भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill) कर्णधारपदाबद्दल क्रिकेट पंडित काहीही म्हणत असले तरी, त्याचा त्याच्या खेळावर काहीही परिणाम झालेला नाही. हे त्याने मँचेस्टर कसोटीच्या (Manchester Test) शेवटच्या दिवशी उत्तम प्रकारे सिद्ध केले आहे. रविवारी गिलने मालिकेतील चौथे शतक झळकावले आणि त्याच्या नावावर अनेक विक्रम जमा झाले. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत सर डॉन ब्रॅडमन यांनाही (Sir Don Bradman) मागे टाकले आहे. त्यामुळे मँचेस्टरमधील 103 धावांची ही खेळी गिलसाठी खूपच खास ठरली. याव्यतिरिक्त आणखी एक कारण आहे, ज्यामुळे या शतकी खेळीचे महत्त्व अधिक वाढले आहे.
गिल 148 वर्षांत पहिला फलंदाज ठरला
कर्णधार म्हणून एकाच मालिकेत अनेक दिग्गजांनी शतके झळकावली आहेत. पण कर्णधार म्हणून कारकिर्दीतील पहिल्याच मालिकेत गेल्या 148 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने चार शतके झळकावली नव्हती. शुभमन गिल ही कामगिरी करणारा पहिला कर्णधार-फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनाही हा कारनामा करता आला नव्हता. त्यामुळे शुभमन गिलसाठी हा विक्रम खास ठरतो.
गिलपूर्वी हे 5 दिग्गज होते, पण...
गिलपूर्वी इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत तीन शतके झळकावणारे पाच खेळाडू आहेत. हे क्रिकेटपटू वॉरविक आर्मस्ट्राँग, ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, विराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ आहेत. पण या सर्वांनी कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत. चार शतके करणारा गिल हा एकमेव फलंदाज आहे. त्यात ओव्हलमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला जाणे अजून बाकी आहे. त्यामुळे या सामन्यात ही गिलला संधी असणार आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड तो आणखी भक्कम करू शकतो.
नक्की वाचा : Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार? माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा
34 वर्षांनंतर एखाद्या भारतीयाचे शतक
जेव्हा मँचेस्टर मैदानावर शतक झळकावण्याचा प्रश्न येतो, तेव्हा गिलपूर्वी हेच काम सचिन तेंडुलकरने 1991 मध्ये केले होते. आणि आता सुमारे 34 वर्षांनंतर गिलच्या बॅटमधून हे शतक आले आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की या दृष्टीने ही शतकी खेळी किती महत्त्वाची आहे. गिलने 238 चेंडूंमध्ये 12 चौकारांसह 103 धावा केल्या. त्यामुळे गिलसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण होता. मात्र कर्णधारम्हणून पदार्पणात गिलने फलंदाज म्हणून केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.