Dilip Doshi Death: टीम इंडियाच्या जिगरबाज खेळाडूचे निधन! फ्रॅक्चर पायाने गोलंदाजी ते 898 बळीचा केलेला विक्रम

Former Indian Cricketer Dilip Doshi Passes Away: दिलीप दोशी अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. दिलीप दोशी यांच्या निधनाने क्रिडाविश्वावर शोककळा पसरली असून बीसीसीआयने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dilip Doshi Died in London: क्रिडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.  भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचे सोमवारी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. वृत्तानुसार, हृदयविकाराच्या झटक्यान त्यांचे लंडनमध्ये निधन झाले. दिलीप दोशी अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. दिलीप दोशी यांच्या निधनाने क्रिडाविश्वावर शोककळा पसरली असून बीसीसीआयने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिलीप दोशी यांनी 33 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान त्यांनी 114 कसोटी बळी घेतले, ज्यामध्ये सहा वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम समाविष्ट आहे. त्यांनी 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3.96 च्या इकॉनॉमी रेटने 22 बळी घेतले. दोशी यांनी सौराष्ट्र, बंगाल, वॉरविकशायर आणि नॉटिंगहॅमशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळले.

दोशी यांनी 1970 च्या दशकातील प्रसिद्ध फिरकीपटूंच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या 32 व्या वर्षी कसोटी पदार्पण केले. नॉटिंगहॅमशायर येथे वेस्ट इंडिजच्या दिग्गज गारफिल्ड सोबर्सचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. 1980 च्या दशकात दोशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकर आणि शांतपणे बाहेर पडले कारण त्यावेळी भारतीय क्रिकेट ज्या पद्धतीने चालवले जात होते त्याच्याशी ते सहमत नव्हते.

दिलीप दोशी हे एकमेव भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी वयाच्या 30 व्या वर्षानंतर पदार्पण केले आणि भारतासाठी 100 हून अधिक विकेट्स घेतल्या. 1981 मध्ये मेलबर्न येथे झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक सामन्यात दिलीप दोशी यांनी भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलत पाच विकेट्स घेतल्या. या सामन्यात ते पायाला फ्रॅक्चर असतानाही खेळले होते. 

Advertisement

KL Rahul Record: इंग्लडमध्ये केएल राहुलचा ऐतिहासिक कारनामा ! शतकी खेळीने जुने रेकॉर्ड उध्वस्त