GT vs Rajasthan Royals : आयपीएलचा 52 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगला.राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्स टीमने धावांचा पाऊस पाडला.सलामीला उतरलेल्या साई सुदर्शन आणि शुबमन गिलने दमदार अर्धशतक ठोकले. साईने 36 चेंडूत 55 धावांची खेळी केली. तर कर्णधार शुबमन गिलने 44 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या जोरावर 84 धावा कुटल्या.या धावांच्या मदतीने गुजरातने 20 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून 229 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानसमोर 230 धावांचं तगडं आव्हान होतं. परंतु, राजस्थानचा अख्खा संघ 16.3 षटकात 152 धावांवर गारद झाला आणि गुजरातचा या सामन्यात 77 धावांनी विजय झाला.
वैभव बाद झाल्यानंतर राजस्थानची दाणादाण उडाली
या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची पुरती दमछाक झाली. कर्णधार यशस्वी जैस्वाल फक्त 3 धावांवर बाद झाला. दुसरीकडे वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूत 36 धावांची आक्रमक खेळी केली. पण वैभव बाद झाल्यानंतर राजस्थानची मिडल ऑर्डर पूर्णपणे ढासळली. ध्रूव जुरेल (24),शिमरन हेटमायर (6),डोनावान फरेरा (4) धावा करून स्वस्तात माघारी परतला. शुभम दुबे 14 तर रवींद्र जडेजा 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
नक्की वाचा >> Pune News : इंदापुरात शेतकरी प्रचंड आक्रमक, 'या' तारखेपासून आमरण उपोषणचा इशारा, विषयच लय हार्ड गुजरात संघासाठी मोहम्मद सिराजने 1,कगिसो रबाडा (2) विकेट घेतल्या. तर राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट घेण्याची कामगिरी केली. तर राजस्थानसाठी ब्रिजेश शर्माने 2,यश राज पुंजा आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.