मालिका जिंकलो, पंड्याचा धमाका, पण गर्लफ्रेंड माहिका शर्माने अख्खं स्टेडियम गाजवलं, पाहा व्हायरल Video

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. पण हार्दिक पंड्या आणि माहिका शर्माच्या त्या व्हिडीओनं सर्वांनाच थक्क केलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Hardik Pandya And Mahika Sharma Video Viral

Hardik Pandya And Mahika Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला. या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने 25 चेंडूत 63 धावांची तुफानी अर्धशतकी खेळी केली.हार्दिकने मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आणि फक्त 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर संपूर्ण स्टेडियमधील क्रिकेटप्रेमींनी हार्दिकवर स्तुतीसुमने उधळली.

याचदरम्यान, हार्दिकने हवेत बॅट फिरवून या अप्रतिम खेळीचा आनंद लुटला. हार्दिकची धडाकेबाज खेळी पाहून त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माही खुश झाली आणि स्टेडियममधूनच त्याला फ्लाईंग किस दिलं.हे संपूर्ण दृष्य कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. दरम्यान, भारताने आफ्रिकेविरुद्धची पाच टी 20 सामन्यांची मालिका जिंकली आहे. भारताने आफ्रिकेला 232 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु, आफ्रिकेला 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 31 धावांनी जिंकला.

हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माची धमाकेदार खेळी

या सामन्यात हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांमध्ये 231 धावांचा डोंगर रचला. पंड्याने 5 चौकार आणि 5 षटकार ठोकून 63 धावांची अर्धशतकी खेळी साकारली.

हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून मॉडेल माहिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अशातच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील पंड्या आणि माहिकाचा व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.

Advertisement

दोघेही इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना माहिती देत असतात. माहिकाही तिचे योगा वर्कआऊटचे फोटो इंटरनेटवर शेअर करत असते. माहिका तिच्या  सौंदर्यासोबतच फिटनेस-लाइफस्टाइलमुळेही खूप लोकप्रिय होत आहे. आता हार्दिकसोबत रिलेशनमध्ये आल्यानंतर माहिका आणखी चर्चेत आली आहे.