- हार्दिक पंड्याने विजय हजारे ट्रॉफीत बडोद्याकडून 93 चेंडूत 133 धावा केल्या, ज्यात 11 षटकार आणि 8 चौकार होते
- एका षटकात त्याने पाच षटकार व एक चौकार लगावून तब्बल 34 धावा वसूल केल्या
- हार्दिकने सातव्या क्रमांकावर येऊन संघाला संकटातून बाहेर काढले आणि बडोद्याला 293 धावांपर्यंत पोहोचवले
Hardik Pandya Batting video viral: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या फलंदाजीतील आक्रमकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भा विरुद्ध खेळताना बडोद्याच्या या खेळाडूने 93 चेंडूत 133 धावांची वादळी खेळी साकारली. या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे हार्दिकने एकाच षटकात 5 षटकार खेचत तब्बल 34 धावा वसूल केल्या. या षटकात त्याने पाच सिक्स आणि एक फोर लगावत विदर्भाच्या गोलंदाजाची पिसं काढली. त्याच्या या वादळी खेळीचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
एका वेळी बडोद्याची अवस्था 6 बाद 136 अशी बिकट झाली होती. त्यावेळी बडोद्याकडून खेळताना हार्दिक सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानंतर त्याने संपूर्ण सामन्याचे चित्र पालटून टाकले. त्याने आपल्या खेळीत 11 षटकार आणि 8 चौकार मारले. विशेषतः 39 व्या षटकात विदर्भाचा फिरकीपटू पार्थ रेखाडे याच्या गोलंदाजीवर त्याने सलग 5 षटकार आणि शेवटच्या चेंडूवर 1 चौकार लगावला. पण त्या आधी 62 चेंडूत हार्दिकने 66 धावा केल्या होत्या. त्याच्या या संयमी खेळीने त्याने संघाला सावरले होत. पण त्यानंतर त्याने गेअर चेंज केला अन् पुढच्या अवघ्या पाच चेंडूत त्याने शतक ठोकले.
हार्दिकच्या या शतकामुळे बडोद्याने 293 धावांपर्यंत मजल मारली. हार्दिकचे हे 119 लिस्ट ए सामन्यांमधील पहिलेच शतक ठरले आहे. यापूर्वी त्याची सर्वोत्तम धावसंख्या 92 होती. मार्च 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हार्दिक पहिल्यांदाच 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळत आहे.हार्दिकने 39 व्या षटकात पार्थ रेखाडेला लक्ष्य केले. त्याने या षटकात 5 षटकार आणि 1 चौकार मारून 34 धावांची लूट केली. त्याच्या या खेळीमुळे बडोद्याला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. हार्दिकने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रथमच या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे.
आपल्या 119 व्या लिस्ट ए सामन्यात हार्दिकला शतकी टप्पा गाठण्यात यश आले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरामध्ये त्याने नाबाद 92 धावा केल्या होत्या. जो त्याचा आतापर्यंतचा उच्चांक होता. आता लिस्ट ए क्रिकेटमध्ये हार्दिकच्या नावावर 2300 पेक्षा जास्त धावा जमा झाल्या आहेत. त्याच्या या फॉर्ममुळे आगामी मालिकांसाठी भारतीय संघाची ताकद वाढणार आहे. त्याच्या या धमाकेदार खेळीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या प्रत्येक फटक्याला बॉलरकडे काहीच उत्तर नव्हतं. तर फिल्डरला चेंडू सिमे पलिकडून आणण्या शिवाय दुसरं काम नव्हतं.