Shubhman Gill Controversy: एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG, दुसरी कसोटी) भारतीय कर्णधार शुभमन गिल त्याच्या एका चुकीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. खेळाच्या चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव घोषित करण्याचा निर्णय घेताना कर्णधार गिलने नाईके कंपनीची जर्सी घातली होती, ज्यामुळे हा नवा वाद उभा राहणार आहे.
याचं कारण म्हणजे अॅडिडास हा भारतीय क्रिकेट संघाचा अधिकृत किट प्रायोजक आहे, ज्याने 2023 मध्ये बीसीसीआयशी पाच वर्षांचा करार केला आहे. मात्र कॅप्टन गिलने प्रायोजक कंपनीची जर्सी न घातला प्रतिस्पर्धी कंपनीची जर्सी घातल्याने तो कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतो.
ट्रेंडिंग बातमी - Ind vs End Test: इंग्लंडला घरच्या मैदानावर लोळवले, भारताचा ऐतिहासिक विजय
किट प्रायोजकत्वासाठी कराराची घोषणा करताना बीसीसीआयने 2023 मध्ये महत्त्वाची घोषणा केली होती. ज्यानुसार " अॅडिडास हा जागतिक स्पोर्ट्सवेअर ब्रँड आता भारताच्या पुरुष, महिला आणि 19 वर्षांखालील संघांसाठी जर्सी, किट आणि इतर अॅक्सेसरीज डिझाइन आणि उत्पादन करेल.
मार्च 2028 पर्यंत चालणाऱ्या या करारामुळे अॅडिडासला खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये किट तयार करण्याचे विशेष अधिकार मिळतील. अॅडिडास ही बीसीसीआयसाठी सर्व मॅच, ट्रेनिंग आणि ट्रॅव्हल पोशाखांची एकमेव पुरवठादार असेल, ज्यामध्ये पुरुष, महिला आणि युवा संघांचा समावेश आहे."
या घोषणेनुसार, बीसीसीआयची प्रायोजक कंपनी अॅडिडास आहे आणि सर्व भारतीय खेळाडूंना अॅडिडास जर्सी घालाव्या लागतात. 2023 मध्ये अॅडिडास आणि बीसीसीआयमध्ये 250 कोटी रुपयांचा करार झाला होता. पण गिलने हा नियम मोडला आहे शुभमन गिलने डाव जाहीर करताना अॅडिडास जर्सी घातली नव्हती.
आता गिलने प्रायोजक कंपनी अॅडिडासची जर्सी घालण्याऐवजी त्याने त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनी नायकेची जर्सी घातली. अशा परिस्थितीत, आता बीसीसीआय या प्रकरणात काय निर्णय घेते? हे पाहणे बाकी आहे. त्याचबरोबर Adidas हा करार रद्द करु शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे.