India Vs Australia: ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु असलेला पाचवा कसोटी सामना टीम इंडियाने गमावला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने तीन बळी गमावत हा सामना जिंकला असून 3- 1 ने मालिकाही खिशात घातली आहे. भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सामन्यातून बाहेर झाला, ज्याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला आहे. या पराभवासोबतच टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे स्वप्न भंगले असून ऑस्ट्रेलियाने फायनलचे तिकीट मिळवले आहे.
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या पराभवामुळे भारताचे सलग तिसऱ्यांदा WTC फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्नही भंगले आहे. या सामन्यात भारताने कांगारूंना 162 धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमान संघाने 4 गडी गमावून पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड 34 आणि ब्यू वेबस्टर 39 धावांवर नाबाद परतले. हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 अशी जिंकली. 10 वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यात कांगारूंना यश आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सामन्याच्या पहिल्या डावात 4 धावांची आघाडी घेतलेल्या टीम इंडियाला दुसऱ्या डावात केवळ 157 धावा करता आल्या. अशा परिस्थितीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण भारतीय संघाकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराह या सामन्यातून बाहेर पडल्याने टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत झाली होती. जसप्रीत बुमराहला पाठदुखीमुळे दुसऱ्या दिवशी मैदान सोडावे लागले.
डावाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५८ धावांवर ३ विकेट्स अशी होती. मात्र येथून ट्रॅव्हिस आणि उस्मान ख्वाजा यांनी 46 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. ख्वाजाने 41 धावा केल्या आणि त्यानंतर हेडने ब्यू वेबस्टरच्या साथीने संघाचा विजय निश्चित केला.