Gautam Gambhir Celebration Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने ( (India Wins Oval Test) ) विजय मिळवत इंग्लडचे गर्वहरण केले. अत्यंत जिगरबाज खेळ करत ओव्हलमध्ये भारताने विजय मिळवला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. एकीकडे मैदानावर टीम इंडियाच्या शिलेदारांचे सेलिब्रेशन सुरु असतानाच ड्रेसिंग रुममध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
ओव्हल कसोटीमध्ये शेवटच्या दिवशी इंग्लंडला फक्त ३५ धावांची आवश्यकता होती आणि भारताला चार विकेट घ्यायच्या होत्या. अनेकांना विश्वास नव्हता की भारतीय संघ या टप्प्यापासून सामना जिंकेल, परंतु मोहम्मद सिराज काहीतरी वेगळेच मनात घेऊन आला होता आणि त्याने असे केले जे क्रिकेटप्रेमी वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. मोहम्मद सिराजने भेदक मारा करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
टीम इंडियाच्या विजयानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. दुसरीकडे गौतम गंभीरने जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी तो चांगलाच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयने भारतीय ड्रेसिंग रूमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्या सहकाऱ्यांसह असा आनंद साजरा करत आहेत जो यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.
गंभीरच्या या सेलिब्रेशनची तुलना थेट 2002 च्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत कर्णधार सौरव गांगुलीने ज्या पद्धतीने आपला टी-शर्ट काढला त्याच्याशी केली जात आहे. गांगुलीचा उत्सव इंग्लंडला' दिलेले सडेतोड उत्तर होते, तर गंभीरचा उत्सव 'बॅजबॉल'चा गर्वहरण केल्याचा आनंद होता.
कसोटी सामना भारताने जिंकला, पण मनं मात्र क्रिस वोक्सच्या एक कृतीने जिंकली, पाहा VIDEO