IND vs PAK: 'तो' 10 ओव्हर खेळला तर सामना संपलाच समजा' 'या' खेळाडूची शोएब अख्तरलाही धडकी

भारत आणि पाकिस्तानची मॅच ही क्रिकेट प्रेंमीसाठी परवणीच असते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shoaib Akhtar: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना आज श्रीलंकेत होत आहे. या सामन्याबाबत दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये कमालाची उत्सुकता आहे. हा सामना हाऊसफुल असणार आहे. भारतातून हजारो चाहते हा सामना पाहण्यासाठी कोलंबोत दाखल झाले आहे. या सामन्यापूर्वी 'रावळपिंडी एक्सप्रेस' शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्याने भारताच्या एका बॅट्समनचे कौतूक करत त्याच्या पासून पाकिस्तानला धोका असल्याचं सांगितलं आहे. अख्तरने म्हटले आहे की जर हा फलंदाज  10 षटके क्रीजवर टिकला, तर पाकिस्तानचा पराभव निश्चित असल्याचे भाकित त्याने वर्तवले आहे.

एका वृत्त वाहीनीशी बोलताना अख्तरने हे भाकीत व्यक्त केले आहे. तो फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून अभिषेक शर्मा आहे. अभिषेक शर्मा हा स्फोट फलंदाज आहे. जर तो दहा ओव्हर मैदानावर टीकला तर पाकिस्तानचे काही खरे नाही असं ही तो म्हणाला. त्यामुळे अभिषेक शर्मा विरोधात वेगळी रणनिती पाकिस्तानला आखावी लागेल असं ही अख्तर म्हणाला आहे. शिवाय जसप्रीत बुमराह हा कोणत्याही परिस्थितीत सामना फिरवू शकणारा गोलंदाज आहे असं ही तो म्हणाला.  भारत या सामन्यात 3 फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Inspiring Story: कायद्याचे शिक्षण नाही, तरीही सर्वोच्च न्यायालयात जिंकली लढाई!, अथर्वच्या संघर्षाची कहाणी

बुमराहची शिस्तबद्ध गोलंदाजी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरेल. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव हे देखील पाकिस्तानविरुद्ध नेहमीच सरस ठरतात, असे त्याने सांगितले आहे. अख्तरने अभिषेक शर्माच्या आक्रमक शैलीचे कौतुक करताना त्याची तुलना सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीशी केली. "सचिन आणि विराटनंतर आता अभिषेकच्या रूपाने भारताला एक स्फोटक फलंदाज मिळाला आहे. त्याने आपल्या खेळीची किंमत ओळखून किमान 10 षटके फलंदाजी केली, तर समोरच्या संघाकडे काहीच उरणार नाही," अशा शब्दांत अख्तरने अभिषेक शर्माचे कौतूक केले आहे. 

नक्की वाचा - IND vs PAK: पाकिस्तानी 'मिस्ट्री' स्पिनर उस्मान तारिकला कसं रोखायचं? अश्विनने सांगितला जालीम उपाय

भारत आणि पाकिस्तानची मॅच  ही क्रिकेट प्रेंमीसाठी परवणीच असते. जगभरातले क्रिकेट प्रेमी या मॅचकडे डोळे लावून बसलेले असतात. सुरूवातीला पाकिस्तानने भारता विरोधात खेळण्याचे टाळले होते. पण आयसीसीच्या दबावानंतर पाकिस्तानने आपली भूमीका बदलली. आता भारत पाकिस्तान सामना होणार आहे. T20 वर्ल्डकपचा विचार करता भारत नेहमीच पाकिस्तान पेक्षा सरस राहीला आहे. त्यामुळे या सामन्यात ही भारताकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. सुर्याच्या नेतृत्वात टीम इंडिया पुन्हा एकदा पाकिस्तानला धुळ चारण्यासाठी सज्ज झाली आहे.  

नक्की वाचा - IND vs PAK: अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध खेळणार की नाही? मॅच आधी शेअर केली फिटनेसबाबत अपडेट


Topics mentioned in this article