IND Vs WI: वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! WTC पॉईंट टेबलमध्येही दबदबा वाढला, टीम इंडिया कितव्या स्थानी?

ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलिया १०० टक्के गुणटक्केवारीसह शीर्ष स्थानावर कायम आहे. श्रीलंका दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव सोबत दुसऱ्या स्थानावर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IND vs WI 2nd Test:  भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजला ७ विकेट्सने पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. वेस्ट इंडीजने भारताला १२१ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने तीन विकेट्स गमावून १२४ धावांवर लक्ष्य गाठले. भारताकडून के. एल. राहुल ५८ धावांवर नाबाद राहिले. तर, जुरेलने ६ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय साई सुदर्शन ३९ धावांवर बाद झाला. तर, जायस्वालने ८ आणि कर्णधार गिलने १३ धावांची खेळी केली. वेस्ट इंडीजकडून दुसऱ्या डावात रोस्टन चेसला दोन विकेट्स मिळाल्या तर जोमेल वॉरिकनला एक विकेट मिळाली. 

 या मुकाबल्यात टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने आपला पहिला डावा ५१८/५ अशा धावसंख्येवर घोषित केला. सलामी फलंदाज यशस्वी जायस्वालने १७५ धावा, तर कर्णधार शुभमन गिलने नाबाद १२९ धावा संघाच्या खात्यात जोडल्या. वेस्ट इंडीजकडून जोमेल वॉरिकनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याचा प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजचा संघ पहिल्या डावात केवळ २४८ धावांवर गळाला. या डावात एलिक अथनाजने ४१ धावा केल्या, तर शाई होपने ३६ धावांची खेळी केली. 

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाला ३ विकेट्स मिळाल्या. भारताकडे पहिल्या डावाच्या आधारावर २७० धावांची आघाडी उरली होती. वेस्ट इंडीजने दुसऱ्या डावात ३९० धावा करून टीम इंडियाला विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य दिले. कर्णधार म्हणून शुभमन गिलचा हा पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत गिलने संघाचे नेतृत्व केले होते, जी २-२ अशी बरोबरीत संपली. गिलने आता वेस्ट इंडिजला क्लीन क्लीन करत त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची दमदार सुरुवात केली आहे. भारताला आता नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

विजयामुळे भारताला किती फायदा? WTC Point Table 2025

या विजयाचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)च्या गुणतालिकेतही दिसून आला. पहिल्या सामन्यातील विजयानंतर दोन वेळा उपविजेतेपद मिळवलेल्या टीम इंडियाने नऊ संघांच्या गुणतालिकेत सहा सामन्यांनंतर ५५.५६ पीसीटी (गुणटक्केवारी) सोबत तिसऱ्या स्थानावर होते. आता या सामन्यानंतरही भारताच्या क्रमांकात कोणताही बदल झालेला नाही. ते तिसऱ्या स्थानावरच आहे. 

Ind vs WI : कोणालाच जमलं नाही..जडेजानं करून दाखवलं! दिल्लीच्या मैदानात मोडला कपिल देव यांचा सर्वात मोठा विक्रम

मात्र, त्यांच्या गुणांमध्ये आणि पीसीटीमध्ये वाढ नक्कीच झाली आहे. टीम इंडियाची पीसीटी आता ६१.९० आहे. त्यांच्या खात्यात आता ५२ गुण झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलिया १०० टक्के गुणटक्केवारीसह शीर्ष स्थानावर कायम आहे. श्रीलंका दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव सोबत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची गुणटक्केवारी ६६.६७% आहे. तर भारत, सहा सामन्यांत तीन विजय, दोन पराभव आणि एक अनिर्णित सोबत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

Advertisement