IND vs ENG, Semi-Final: भारत आणि इंग्लड यांच्यामध्ये टी ट्वेंटी विश्वचषकाचा सेमीफायलनचा सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला. या विजयामागे अनेक हिरो असले तरी या विजयाची खरी कहाणी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्या यांच्या दोन रणनितीमध्ये दडली आहे, ज्याने सर्वांनाच चकित केले.
गंभीर-सुर्यकुमारचा डाव, इंग्लडचे पाणिपत
सामन्यादरम्यान, जेव्हा इंग्लंडचा लेग-स्पिनर आदिल रशीद जोरदार गोलंदाजी करत होता, तेव्हा गंभीरने शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवून सर्वांना आश्चर्यचकित केले, कारण दुबे लेग-स्पिनरची धुलाई करतो हे त्याला माहीत होते. यापूर्वी, नेदरलँड्सविरुद्ध, त्याने त्याच स्थानावर ६६ धावा केल्या होत्या आणि त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याचा परिणाम दिसून आला. दुबेने त्याच्यावर हल्ला चढवला, ज्यामुळे आदिल रशीदवर दबाव आला आणि इंग्लंडची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली.
तिलक वर्मा ७ व्या स्थानावर...
सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे संपूर्ण स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माला थेट ७ व्या क्रमांकावर बढती देण्यात आली. तिलकला इतक्या खाली फलंदाजी करताना पहिल्यांदाच कोणी पाहिले. गंभीर आणि सूर्याला शेवटच्या षटकांमध्ये षटकार मारता येईल असा खेळाडू हवा होता म्हणून हा निर्णय घेण्यात आला. हे लक्षात घेऊन त्यांनी त्याला आत पाठवले आणि तिलकने फक्त 7 चेंडूत 21 धावा फटकावल्या.
भारताच्या विजयी फरकाचा विचार केला तर भारताने सामना फक्त ७ धावांनी जिंकला. याचा अर्थ तिलकचा डाव विजय आणि पराभवातील फरक मानला जाऊ शकतो. गंभीरच्या बुद्धिबळाच्या खेळीने कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या माजी क्रिकेटपटूंनाही चकित केले. सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यात टीम इंडिया फलंदाजी क्रमाने एवढा मोठा धोका पत्करेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. परंतु गंभीर आणि सूर्याच्या जोडीने हे दाखवून दिले की चांगल्या हेतूने, प्रत्येक चाल फायदेशीर आहे. आता सर्वांच्या नजरा ८ मार्च रोजी होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जेतेपदाच्या सामन्यावर आहेत.