2 days ago

India vs New Zea Land Final Match Updates : टी-20 वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्याचा थरार भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला. भारताने न्यूझीलंडला 256 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची पुरती दुमछाक उडाली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिरकीपटू अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्याने भेदक मारा केला. न्यूझीलंडचा संघ 19 षटकात 159 धावांवर गारद झाला आणि भारताने टी-20 वर्ल्डकप 2026 चं जेतेपद जिंकलं. जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतले. अक्षर पटेलनेही फिरकीची जादू दाखवत न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना बाद केलं. हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्माला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारताने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत 20 षटकांमध्ये 5 बाद 255 धावांपर्यंत मजल मारली. अभिषेक शर्मा (52), संजू सॅमसन (89),इशान किशन (52),हार्दिक पंड्या 18 आणि शिवम दुबेनं नाबाद 26 धावांची वादळी खेळी केली. पहिल्या इनिंगनंतर न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज 256 धावांचं टार्गेट गाठण्यासाठी मैदानात उतरले. परंतु अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने भेदक मारा करून न्यूझीलंडचे दोन स्टार फलंदाज बाद केले. अक्षरने फिन एलनला 9 आणि रचिन रविंद्रला 1 धावेवर बुमराहने बाद केलं. अक्षर पटेलने फिरकीची जादू दाखवत न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. अक्षरने फिन एलनला 9 आणि फिलिप्सला 5 धावांवर बाद केलं. पॉवर प्ले मध्ये 6 षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या 52-3 वर पोहोचली होती.

256 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमछाक उडाली होती. भारताचे गोलंदाज अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्याने किंवींचे पाच फलंदाज बाद केले. फिन एलन,फिलिप्स,रचिन रविंद्र आणि चॅपमॅन स्वस्तात माघारी परतले. 11 षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या 103-5 वर पोहोचली होती. 13 षटकानंतर न्यूझीलंडचे 6 विकेट्स गेले होते. न्यूझीलंडची धावसंख्या 128-6 अशी होती. त्याचदरम्यान मैदानात एक राडा पाहायला मिळाला. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मिचेलला लो फुल टॉस चेंडू फेकला. त्यानंतर मिचेलने त्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू अर्शदीपच्या हातात गेला. त्यानंतर अर्शदीपने मिचेलला रन आऊट करण्यासाठी चेंडू स्टम्पवर फेकला. पण तो चेंडू मिचेलच्या दिशेन गेला. त्यानंतर मिचेल रागावला आणि पंचाना याबाबत जाब विचारला. पण नंतर सूर्यकुमारने मैदानात येऊन मिचेलला खेळाडू वृत्ती दाखवली. 

Mar 08, 2026 22:49 (IST)

Ind vs Nz Final Live : भारताचा टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये रोमहर्षक विजय

टी-20 वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्याचा थरार भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला. भारताने न्यूझीलंडला 256 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची पुरती दुमछाक उडाली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिरकीपटू अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्याने भेदक मारा केला. न्यूझीलंडचा संघ 19 षटकात 159 धावांवर गारद झाला आणि भारताने टी-20 वर्ल्डकप 2026 चं जेतेपद जिंकलं.

Mar 08, 2026 22:37 (IST)

Ind vs Nz Final Live : बुम बुम बुमराह! 2 चेंडूंवर 2 फलंदाजांना केलं बाद

भारत टी-20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर आहे. जसप्रीत बुमराहने 16 व्या षटकात एका पाठोपाठ दोन विकेट्स घेतल्या. बुमराहन निशम आणि मॅट हेन्रीला स्लो यॉर्कर टाकून बाद केलं. जसप्रीतने दोघांचाही त्रिफळा उडवला.17 षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या 152-8 वर पोहोचली आहे.

Mar 08, 2026 22:09 (IST)

Ind vs Nz Final Live : अर्शदीप-मिचेल यांच्यात मैदानात काय घडलं?

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मिचेलला लो फुल टॉस चेंडू फेकला. त्यानंतर मिचेलने त्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू अर्शदीपच्या हातात गेला. त्यानंतर अर्शदीपने मिचेलला रन आऊट करण्यासाठी चेंडू स्टम्पवर फेकला. पण तो चेंडू मिचेलच्या दिशेन गेला. त्यानंतर मिचेल रागावला आणि पंचाना याबाबत जाब विचारला. त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आणि मिचेलला समजावलं. दरम्यान, 13 षटकानंतर न्यूझीलंडचे 6 विकेट्स गेले आहेत. न्यूझीलंडची धावसंख्या 128-6 अशी आहे. अक्षर पटेलने मिचेलला 17 धावांवर बाद केलं. 15 षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या 139-6 झाली आहे.

Mar 08, 2026 21:52 (IST)

Ind vs Nz Final Live : न्यूझीलंडचे टॉप 5 फलंदाज बाद

256 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमछाक उडाली आहे. भारताचे गोलंदाज अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्याने किंवींचे पाच फलंदाज बाद केले. फिन एलन,फिलिप्स,रचिन रविंद्र आणि चॅपमॅन स्वस्तात माघारी परतले आहेत. 11 षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या 103-5 वर पोहोचली आहे.

Advertisement
Mar 08, 2026 21:35 (IST)

Ind vs Nz Final Live : अक्षर पटेलची भेदक गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये न्यूझीलंडला 3 धक्के

अक्षर पटेलने फिरकीची जादू दाखवत न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. अक्षरने फिन एलनला 9 आणि फिलिप्सला 5 धावांवर बाद केलं. पॉवर प्ले मध्ये 6 षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या 52-3 वर पोहोचली आहे.

Mar 08, 2026 21:24 (IST)

Ind vs Nz Final Live : न्यूझीलंडचे दोन स्टार फलंदाज बाद

भारताने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत 20 षटकांमध्ये 5 बाद 255 धावांपर्यंत मजल मारली.  न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज 256 धावांचं टार्गेट गाठण्यासाठी मैदानात उतरले. परंतु अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने भेदक मारा करून न्यूझीलंडचे दोन स्टार फलंदाज बाद केले. अक्षरने फिन एलनला 9 आणि रचिन रविंद्रला 1 धावेवर बुमराहने बाद केलं. 4 षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या 50 च्या पुढे गेली आहे.

Advertisement
Mar 08, 2026 20:47 (IST)

Ind vs Nz Final Live : भारताने उडवला किंवीचा धुव्वा! 256 धावांचं टार्गेट

भारताने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत 20 षटकांमध्ये 5 बाद 255 धावांपर्यंत मजल मारली. अभिषेक शर्मा (52), संजू सॅमसन (89),इशान किशन (52),हार्दिक पंड्या 18 आणि शिवम दुबेनं नाबाद 26 धावांची वादळी खेळी केली.

Mar 08, 2026 20:38 (IST)

Ind vs Nz Final Live : चौकार-षटकार ठोकून हार्दिक पंड्या बाद

भारताने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. 19 षटकानंतर भारताचे 5 फलंदाज बाद झाले असून धावसंख्या 231 वर पोहोचली आहे.

Advertisement
Mar 08, 2026 20:27 (IST)

Ind vs Nz Final Live : भारताचा कर्णधार शून्यावर बाद

इशान आणि संजू बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवही तंबूत परतला. सूर्याला भोपळाली फोडता आला नाही. सूर्यकुमार शून्यावर बाद झाला असून भारताची धावसंख्या 18 षटकानंतर 220-4 अशी आहे.

Mar 08, 2026 20:20 (IST)

Ind vs Nz Final Live : संजू सॅमसनचं शतक हुकलं, भारताला तिसरा धक्का

भारत 15 षटकानंतर 2 बाद 203 धावांवर पोहोचला आहे. संजू सॅमसनने वादळी खेळी करून 89 धावांची अर्धशतकी खेळी केली. संजूने 46 चेंडूत 89 धावा कुटल्या. यामध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. संजू पाठोपाठ इशान किशनही 54 धावांवर बाद झाला.

Mar 08, 2026 20:01 (IST)

Ind vs Nz Final Live : संजू सॅमसन शतकाच्या उंबरठ्यावर

भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने वादळी खेळी करून अर्धशतक ठोकलं आहे. संजू शतकाच्या उंबरठ्यावर आहे. संजू 37 चेंडूत 67 धावांवर नाबाद आहे. भारताची धावसंख्या 12 षटकानंतर 161-1 अशी आहे. 14 षटकानंतर भारताची धावसंख्या 191-1 झाली आहे. 

Mar 08, 2026 19:45 (IST)

ind vs nz Live : वादळी फिफ्टी करून अभिषेक शर्मा झाला बाद

अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. अभिषेकने 21 चेंडूत 52 धावा कुटल्या. शर्माने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. न्यूझीलंडचा गोलंदाज रचिन रविंद्रने अभिषेकला झेलबाद केलं. भारत 8 षटकानंतर 111-1 धावसंख्येवर होता. दहा षटकानंतर भारताची धावसंख्या 127-1 वर आहे.

Mar 08, 2026 19:34 (IST)

अहमदाबादमध्ये भारताचा 'पॉवर प्ले', पहिल्या 36 चेंडूत संजू-अभिषेकने पाडला धावांचा पाऊस

भारताचे स्टार फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने पॉवर प्ले मध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत भारतीय फलंदाजांनी धावंसख्येला गती दिली आहे. पहिल्या सहा षटकानंतर म्हणजे पॉवर प्ले मध्ये भारताने बिनबाद 92 धावा कुटल्या आहेत. अभिषेक शर्माने 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे.

Mar 08, 2026 19:21 (IST)

Ind vs Nz Final Live : अहमदाबादच्या मैदानात धावांचा पाऊस

पहिल्या चार षटकांमध्ये भारताने धडाकेबाज सुरुवात केली आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने मैदानात धावांचा पाऊस पाडला आहे. अभिषेक आणि संजूने चौकार षटकारांचा धडाका लावला आहे. चार षटकानंतर भारताची धावसंख्या 51-0 अशी आहे.

Mar 08, 2026 19:07 (IST)

Ind vs Nz Final Live : संजू सॅमसन-अभिषेक शर्मा सलामीसाठी मैदानात, संजूने मारला सिक्स

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात फायनलचा महामुकाबला सुरु झाला आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचे स्टार फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा मैदानात उतरले आहेत. संजूने पहिल्याच षटकात सिक्सर ठोकून भारताची दमदार सुरुवात केली आहे. 3 षटकानंतर भारत 27-0 वर आहे.

Mar 08, 2026 18:38 (IST)

Ind vs Nz Final Live : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात फायनलचा सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. नाणेफेकीचा कौल नुकताच पार पडला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Mar 08, 2026 17:52 (IST)

Ind vs Nz Final Live : भारताचा वर्ल्डकप विजेता कर्णधार अहमदाबादमध्ये पोहोचला, व्हिडीओ समोर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज टी-20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्याचा थरार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. टीम इंडिया अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली आहे. तसच भारताचा वर्ल्डकप विजेता कर्णधार रोहित शर्माही स्टेडियममध्ये पोहोचत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Mar 08, 2026 17:49 (IST)

Ind vs Nz Final Live : अहमदाबादमध्ये भारतीय संघ दाखल, पाहा व्हिडीओ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज टी-20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्याचा थरार रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचला आहे. टीम इंडियाच्या ताफ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mar 08, 2026 17:36 (IST)

Ind vs Nz Final Live : अहमदाबादमध्ये फायनल सामन्यात पाऊस कोसळणार का?

Ind vs Nz Final Live :अहमदाबादमध्ये आज फायनल सामन्यात पावसाची शक्यता खूपच कमी आहे.आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे.त्यामुळे सामन्यात पाऊस खोडा घालणार नाही,असा अंदाज आहे. उकाडा असल्याने खेळाडूंना उष्ण हवामानाचा सामना करावा लागू शकतो. दिवसा कमाल तापमान जवळपास 40 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते. तर रात्री तापमान घसरून अंदाजे 23 डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार असल्यामुळे दिवसाच्या तीव्र उष्णतेचा परिणाम थोडा कमी होऊ शकतो.