Ajinkya Rahane: ब्रेकिंग! अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला अलविदा; सर्व स्तरांतून निवृत्तीची घोषणा

सोशल मीडियावर पोस्ट करत अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Ajinkya Rahane Retirement: क्रिडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. अजिंक्य रहाणेने  २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही. 

अजिंक्यने रहाणेने भारतासाठी आपला शेवटचा कसोटी सामना जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तसेच शेवटचा एकदिवसीय सामना २०१८ मध्ये आणि शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये खेळला होता. त्याने भारतासाठी ८५ कसोटी सामने खेळले असून १४४ डावांमध्ये ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा केल्या आहेत.

Advertisement

या काळात त्याने १२ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५.२६ च्या सरासरीने २,९६२ धावा केल्या आहेत. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने २० डावांमध्ये २०.८३ च्या सरासरीने ३७५ धावा केल्या आहेत.